AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना वाढतोय, नाशिकमध्ये रुग्णांसाठी बेड्सचं नियोजन कसं? मंत्री भुजबळांकडून आढावा, 640 बेड्स वाढवले

कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडवर आले आहेत (Government increase 640 beds for covid patients in Nashik)

कोरोना वाढतोय, नाशिकमध्ये रुग्णांसाठी बेड्सचं नियोजन कसं? मंत्री भुजबळांकडून आढावा, 640 बेड्स वाढवले
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नाशकात प्रशासन सतर्क, 640 बेड्स अतिरिक्त वाढवले, उपाययोजनांसाठी छगन भुजबळांकडूनही ताकद
| Updated on: Apr 04, 2021 | 4:32 PM
Share

नाशिक : कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी आज नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना भेट दिली. याशिवाय त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला त्यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मनपा आयुक्त प्रवीण अष्टीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यात उपचारासाठी 640 अतिरिक्त बेड्स वाढवल्याची माहिती त्यांनी दिली (Government increase 640 beds for covid patients in Nashik).

640 अतिरिक्त बेडची वाढ कशी केली?

“जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वी 110 खाटांची क्षमता होती. तिथे आता 90 बेड वाढविल्याने 200 बेडची क्षमता झाली आहे. तसेच बिटको रुग्णालयात 300, नाशिकरोड येथील अग्निशमन दलाची इमारत आणि भक्तनिवास या कोविड केअर सेंटरमध्ये 250 असे एकूण 640 अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मविप्र आणि एसएमबीटी रुग्णालय अधिग्रहीत करण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातूनही बेड उपलब्ध होतील”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं (Government increase 640 beds for covid patients in Nashik).

बिटको रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाचे सिटी स्कॅन मशिन

बिटको रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाचे सिटी स्कॅन मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे मशिन लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या मशिनने दिवसभरात दोनशे रुग्णांचे स्कॅनिंग होणार आहे. तसेच बिटकोमध्ये लवकरच प्रति दिवस पाच हजार स्वॅब तपासले जाणार असल्याची माहिती, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा

“कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य उपचारांबरोबरच ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नवीन 250 लिटर क्षमतेचे 27 ड्युरा सिलेंडर मागविण्यात आले आहे. या सिलेंडरमुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे सुलभ होणार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधांचे नियोजन प्रशासन आपल्यास्तरावरुन करत आहे. तरीही कोरोनासारख्या संकटकाळात खाजगी डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना आपली सेवा देण्यासाठी पुढे यावे”, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

10 ते 12 व्हेंटीलेटर आपत्कालीन परिस्थितीतीसाठी राखीव

व्हेंटीलेटरबाबत योग्य नियोजन करुन आवश्यक त्या ठिकाणी व्हेंटीलेटर पोहचविण्यात आले आहे. 10 ते 12 व्हेंटीलेटर आपत्कालीन परिस्थितीतीसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बिटको रुग्णालयातील सिटी स्कॅन, एमआरआय कक्ष, कोविड कक्ष, प्रयोगशाळेस भेट दिली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा आणि अतिरिक्त वाढविण्यात आलेल्या बेडचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबधित गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड कक्षाचीही पाहणी केली आहे.

हेेही वाचा : नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा धुव्वा, अशोक चव्हाण म्हणतात…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.