गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट, शिर्डी ते तुळजापूर, साध्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा

शिर्डीचं साई मंदिर ते तुळजापूरच्या भवानी देवीच्या मंदिरातही अगदी साध्या पद्धतीने गुढी उभारुन पूजा करण्यात आली.

गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट, शिर्डी ते तुळजापूर, साध्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा

मुंबई : कोरोनाच्या सावटात संपूर्ण राज्यात गुढीपाडवा (Gudi Padwa Celebration In Temple) सण साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साई मंदिर ते तुळजापूरच्या भवानी देवीच्या मंदिरातही अगदी साध्या पद्धतीने गुढी उभारुन पूजा करण्यात आली. अवघ्या काही अधिकारी आणि मंदिरातील पुजारींच्या (Gudi Padwa Celebration In Temple) उपस्थितीत मंदिरांमध्ये गुढी उभारण्यात आली.

साईमंदिरावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी

साई मंदिरात मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. साई मंदिर हे दर्शनासाठी बंद असले, तरी पुजाविधी सुरु आहेत. आज साई मंदिरावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी उभारण्यात आली. सबुरीने घेतलं तरच कोरोना सारख्या संकटावर आपण मात करु शकतो. जगावरील करोनाचं संकट दूर व्हावे, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा : अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा, मोदी-शाहांच्या मराठीत शुभेच्छा

दरवर्षी साईभक्तांची गर्दी असणाऱ्या साई मंदिरात यावेळी मोजक्या पुजारी आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सपत्नीक गुढी आणि पंचांगाचे विधिवत पूजन केले. त्यानंतर साई समाधी मंदिराच्या कळसावर गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी देवीला साखरेच्या गाठीचा हार

आज गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तापैकी एक. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरावरील ब्रम्ह ध्वज आजच्या मुहूर्तावर  बदलण्याची एक परंपरा आहे. तसेच  गुढीपाडव्या निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सकाळी साखरेच्या गाठी हार घालून सजवण्यात आले. तसेच, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा विठ्ठल (Gudi Padwa Celebration In Temple) जोशी आणि त्यांच्या पत्नी आश्विनी जोशी यांच्या आर्थिक सहकार्यातून 51 हजार सोन चाफ्याच्या फुलांनी सजवण्यात आला.

तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेल्या शिवकालीन अलंकारांचा साज

गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन अलंकार घालण्यात आले. यात जय भवानी, राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आलेली सोन्याची माळ, मणिक, मोत्यांची माळ, रत्नजडीत जरी टोप असे अलंकार घालण्यात आलेत. तसेच, तुळजाभवानी मंदिरावर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुढी उभारण्यात आली.

अंबाबाई मंदिरात गुढी उभारुन विशेष पूजा

गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गुढी उभारुन विशेष पूजा करण्यात आली. एरवी गुढीपाडव्यादिवशी शहरातील अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिर गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे गुढीपाडवा असूनही मंदिराच्या आवारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोरोनचं संकट दूर व्हावं, यासाठी श्रीपूजकांकडून कुंकुमार्चन (Gudi Padwa Celebration In Temple) करत साकडं घालण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *