AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Rain: तिघांसह रिक्षा वाहून गेली, म्हैस मेली, घराच्या भिंतीला तडे… लातूरमध्ये पावसाचा हाहा:कार; किती झालं नुकसान?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एक रिक्षा वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

Latur Rain: तिघांसह रिक्षा वाहून गेली, म्हैस मेली, घराच्या भिंतीला तडे... लातूरमध्ये पावसाचा हाहा:कार; किती झालं नुकसान?
Latur Rain
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 17, 2025 | 4:48 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वाहने आणि जनावरे वाहून गेली असल्याचे समोर आले आहे. पावसामुळे आलेल्या पुराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यातून पावसामुळे झालेल्या नुकसानाची तीव्रता समोर येत आहे. पावसामुळे लातूर जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे.

रिक्षा गेली वाहून

लातूर जिल्ह्यात 16 व 17 सप्टेंबर रोजी पावसामुळे अनेक अपघात घडले आहेत. जळकोट तालुक्यातील पाटोदा – माळहिप्परगा मार्गावरील नाल्यावरून जाताना ऑटो रिक्षा पुरात वाहून गेली आहे. रिक्षातून चाक प्रवासी प्रवास करत होते, यातील चालक रिक्षातून वेळीच बाहेर आला, मात्र रिक्षा इतर 3 प्रवाशांसह वाहून गेली. या तिघांचा शोध सुरु असताना विठ्ठल धोंडिबा गवळी (56) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच वैभव पुंडिलक गायकवाड (24) आणि संगीता मुहारी सूर्यवंशी (32) यांचा शोध स्थानिक पोलीस व एडीआरएफच्या पथकाकडून घेतला जात आहे.

जळकोट तालुक्यातील तिरुका गावात सुदर्शन केरबा घोणशेट्टी हा व्यक्ती मासेमारीसाठी करण्यासाठी गेला होता, मात्र तो तिरु नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. सुदर्शन यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाहीत. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे.

वीज पडल्यामुळे म्हशीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

निलंगा तालुक्यातील हाडोळी गावातील शेतकरी मेहबूब शेख यांची एक म्हैस वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडली आहे. तसेच मुसळेवाडी येथे ज्योतीराम दत्तात्रय जाधव यांच्याही एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ज्योतीराम यांच्या पत्नी सोजरबाई जाधव गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औसा तालुक्यातील उंबडगा गावात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 8 घरातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

घराला गेले तडे

चाकूर तालुक्यातील बेलगाव येथे गणपत ज्ञानोबा माने यांची म्हैस वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडली आहे. तसेच चाकूर गावात मंगलदास दिनाजी जवाले आणि विठ्ठल माकणे यांच्या घराच्या पाठीमागे वीज पडली, त्यामुळे घराच्या भिंतीला तडे गेले आहेत. तसेच इन्व्हर्टर, बॅटरी, फॅन यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?