पुण्यात पावसाने घरांना ओढ्याचं स्वरुप, विधानसभेचा निकाल लावूनच पाऊस परतणार!

राज्यभर परतीच्या पावसाचं (Maharashtra heavy rain) धुमशान पाहायला मिळत आहे. मुंबईत रात्री तासभर जोरदार पाऊस (Maharashtra heavy rain) कोसळला.

पुण्यात पावसाने घरांना ओढ्याचं स्वरुप, विधानसभेचा निकाल लावूनच पाऊस परतणार!

पुणे : राज्यभर परतीच्या पावसाचं (Maharashtra heavy rain) धुमशान पाहायला मिळत आहे. मुंबईत रात्री तासभर जोरदार पाऊस (Maharashtra heavy rain) कोसळला. तर पुण्यात ऐन पावसाळ्याप्रमाणे रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी पाहायला मिळालं. पुण्यातील बी टी कवडे रोडवर तारादत्त कॉलनीत पावसाचं पाणी तुंबलं. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी साचलं. रात्रभर झालेल्या पावसाने घरात इतकं पाणी साचलं की एखादा ओढा वाहतोय की काय असा प्रश्न पडावा.

घरात पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू पाण्यात तरंगत होत्या. दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या.

हवामान विभागाची माहिती

राज्यभर पडणारा पाऊस हा परतीचा नसून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस पडत आहे, असं हवामान तज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितलं. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने, महाराष्ट्रात वीजांचा कडकडाट करत संध्याकाळी पाऊस पाहायला मिळतो. कमी दाबाचा पट्टा काही दिवस तसाच राहणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत पाऊस मेघगर्जनेसह होईल, मग या महिन्याच्या अखेर पाऊस कमी होईल, असं शुभांगी भुते यांनी सांगितलं.

24 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल

दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. 24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतच्या धामधुमीत तळ ठोकून असलेला पाऊस, निकाल लावूनच परतण्याची चिन्हं आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *