AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अपघाताने राज्यात हळहळ, बापासह दोन्ही लेकींनी जागीच सोडला जीव; पत्नीही गंभीर जखमी

Accident in Washim : वाशिम–कनेरगाव रोडवरील देवठाणाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

भीषण अपघाताने राज्यात हळहळ, बापासह दोन्ही लेकींनी जागीच सोडला जीव; पत्नीही गंभीर जखमी
Accident in Washim 3 DiedImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 26, 2026 | 9:23 PM
Share

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी बातमी आहे. वाशिम–कनेरगाव रोडवरील देवठाणाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिकअप वाहनाच्या चुकीमुळे मोटारसायकलवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातात एक महिलाही गंभीर जखमी झाली आहे. या अपघातातील मृत देवठाणा गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापासह दोन लेकींचा मृत्यू

वाशिममधून मोठा बातमी समोर आली आहे. वाशिम–कनेरगाव रोडवरील देवठाणाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहनाच्या चुकीमुळे मोटारसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बापासह दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच मृत मुलींची आई गंभीर जखमी झाली आहे. मृत मुलींपैकी एक 5 वर्षांची तर दुसरी 12 वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्ञानेश्वर निवृत्ती खडसे ,किर्ती खडसे, केतकी खडसे अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

इचलकरंजीत विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

रांगोळी गावातील तीन तरुणांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेचा निकाल घेण्यासाठी बाहेरगावाहून इचलकरंजीत आलेल्या तिघांचा डंपरला धडकून अपघात झाला. या भीषण अपघातात गणेश कांबळे या युवकाचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे रांगोळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विसरवाडी–नंदुरबार महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात, दोन जण गंभीर जखमी

विसरवाडी–नंदुरबार महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला असून अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः खांडबारा ते विसरवाडी दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने प्रवास करणे वाहनचालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे पुन्हा मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, भरडू गावाजवळील धोकादायक खड्ड्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि वाहन धारकांकडून केली जात आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,