मी केंद्रातलं मंत्रीपद नाकारलं, पंकजा मुंडेंचा मुंबईत गौप्यस्फोट, वाचा काय काय म्हणाल्या?

कुणाला संपवून मला राजकारण करायचं नाही. माझ्या राजकारणाचा पाय काही मला संत्री करा, मला मंत्री करा, माझ्या बहिणीला काही करा, माझ्या नवऱ्याला काही करा, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत.

मी केंद्रातलं मंत्रीपद नाकारलं, पंकजा मुंडेंचा मुंबईत गौप्यस्फोट, वाचा काय काय म्हणाल्या?
pankaja munde
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 2:31 PM

पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत समर्थकांसमोर जोरदार भाषण केलं. अपेक्षेप्रमाणं त्यांनी कोणताही मोठा निर्णय जाहीर केला नाही. एवढच नाही तर भाजपचा राजीनामा देणार नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलं. याच भाषणा दरम्यान त्यांनी, मी केंद्रातलं मंत्रीपद नाकारल्याचाही गौप्यस्फोट केला.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पंकजा मुंडे राजीनामा देतील, पक्ष सोडतील किंवा त्यांनी तसं करावं अशी मागणी पंकजा समर्थक सोशल मीडियावर करत होते. त्यावर बोलताना पंकजा म्हणाल्या,-‘मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करावं, जे 2 जूनला मुंडे साहेब म्हणले होते, भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. ते मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करावं. याच्यासाठीच संघर्ष यात्रा काढली, का मला काही करावं म्हणून काढली?(कार्यकर्त्यांना सवाल) केंद्रामध्ये पद देऊ करण्याचा प्रस्ताव पाठवला होता, राज्याच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंना केंद्रात मंत्री करा, पद द्या. मी नकारलं ते मंत्रीपद. मग तेव्हा, जेव्हा माझं अस्तित्व पणाला लागलं होतं, माझ्याकडं शून्य ताकद आहे असं वाटत होतं, वाटत होतं की आपल्याकडे काही नाही. पायाखालची जमीन सरकली होती. तेव्हा मंत्रीपद नाकारलेली पंकजा मुंडे, मंत्रीपदासाठी राजीनामा देणारय अन् तुम्हाला राजीनामा द्यायला लावणारय’?

संघर्ष यात्रा कशासाठी काढली होती? गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढलेली होती. त्या यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. त्या यात्रेमुळेच भाजपचं राज्यात सरकार आलं असही विश्लेषण त्यावेळेस अनेकांनी केलं होतं. त्याचीच आठवण काढत आज पंकजा मुंडे म्हणाल्या- ‘कधी मी भाषण केलं? मी मुंडे साहेबांची मुलगीय? मी मुंडे साहेबांचा वारसाय? मला अमूक पद पाहिजे, म्हणले का मी कधी आयुष्यात? मला जेव्हा संघर्ष यात्रेमध्ये सभा घेत होते, लोकं म्हणत होते, लोकांची भावना होती. (लोकांच्या मनातली मुख्यमंत्री असा संदर्भ त्यांनी बोलता बोलता टाळला) पण मला माहिती होतं, कोणाचं नेतृत्व येणार? माझ्या बापाचं स्वप्न काय होतं? भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करणं. लोक पक्षापासून दूर जातील. लोकं नाराज होऊन पक्षापासून दूर जातील. म्हणून एकत्र आणावं’. माझ्या राजकारणाचा पाया पंकजा मुंडे पुढे असही म्हणाल्या की, मी सत्तेची लालची नाही. कुणाला संपवून मला राजकारण करायचं नाही. माझ्या राजकारणाचा पाय काही मला संत्री करा, मला मंत्री करा, माझ्या बहिणीला काही करा, माझ्या नवऱ्याला काही करा, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. माझा परिवार काही फक्त प्रीतम मुंडे आहे का? माझा परिवार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुंडे साहेबांवर निष्पाप प्रेम करणारा कार्यकर्ताय’.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.