AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण…’, नारायण राणेंचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाले?

Narayan Rane : सिंधुदुर्ग येथे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. आपल्या भाषणात नारायण राणेंनी एक धक्कादायक किस्साही सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

'मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण...', नारायण राणेंचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाले?
Narayan RaneImage Credit source: Google
| Updated on: Jan 04, 2026 | 10:14 PM
Share

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कोकणात मोठं शक्ती प्रदर्शन केले. कणकवली येथील कार्यक्रमात बोलताना राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले आहे. सिंधुदुर्गमधील आपल्या भाषणात नारायण राणेंनी एक धक्कादायक किस्साही सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे भाषण करताना नारायण राणे म्हणाले की, ‘आजच्या कार्यक्रमच आयोजन करण्याचा उद्देश मला माहित नाही. नारा एकच हे काय आहे अस मी विचारलं कारण सर्वत्र नारा एकच असे बॅनर लागले होते. जेव्हा विचारलं तेव्हा समजल की नारा एकच म्हणजे नारायण राणे हे इथ आल्यावर समजलं. मी भाजप मध्ये आल्यावर सांगितल होत की भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. एक आहे मी जगेन तर मानाने जगेन अस मानणारा राणे आहे. मी सगळी पदं कर्तृत्वाने मिळवलेली आहेत. माझं ध्येय होतं त्याप्रमाणे मी बदलत गेलो.’

मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण…

पुढे बोलताना नारायण राणे यांनी एक जुना किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले की, ‘मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला समजवलं म्हणून मी खून केला नाही.’ मात्र ही कधीची गोष्य आहे याबाबत माहिती समोर आलेली आहे. आजच्या भाषणात नारायण राणेंनी राजकारणातून निवृत्तीचेही संकेत दिले आहेत.

राणे संपणार नाही

नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत देताना म्हटले की, ‘मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मी लोकसेभवर जाण्याआधी सुद्धा मला तिकीट नको अस सांगितलं होत. मात्र नड्डा यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला राजकारणातून सोडणार नाही. मी घमेंडखोर आहे, मी कोणापेक्षा कमी आहे अस कधीच मानत नाही. मला त्याचा अभिमान वाटतो. मात्र आता कुठेतरी थांबायला पाहिजे. राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो, राणे पुरून उरला आहे. माझी रास गुरू आहे. ती स्ट्राँग आहे. मी कार्यकर्त्यांना सांगायला आलो आहे की राणे संपणार नाही. कुटुंब म्हणून राणे कुटुंब एकत्र राहणार आहोत.

अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?.
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो.
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?.
या प्रचारसेभेत चाललंय काय? पाठीमागं शिवरायांचा पुतळा, पुढं नाचगाणं....
या प्रचारसेभेत चाललंय काय? पाठीमागं शिवरायांचा पुतळा, पुढं नाचगाणं.....
संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्लाबोल
संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्लाबोल.
विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाणांकडून माफी
विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाणांकडून माफी.
वीर सावरकर यांचे विचार मान्य करा, अजित दादांना भाजपकडून स्पष्ट संदेश!
वीर सावरकर यांचे विचार मान्य करा, अजित दादांना भाजपकडून स्पष्ट संदेश!.
शिवाजी महाराज पाटीदार! भाजप मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानं नवा वाद
शिवाजी महाराज पाटीदार! भाजप मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानं नवा वाद.
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक.
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्....