AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : पुढील 7 दिवस धोक्याचे, 15 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) कडून 15 राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD Weather Update : पुढील 7 दिवस धोक्याचे, 15 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
Updated on: Jul 06, 2025 | 8:39 PM
Share

देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि लगलच्या पंजाब राज्यामध्ये एक अप्पर एअर सर्कुलेशन तयार झाले आहे, सोबतच नागालँड आणि म्यानमारमध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे या प्रदेशात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागनं दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड, पूर्व राजस्थान, जम्मू -काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगढ, आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील सहा दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर राजस्थानमध्ये येत्या दहा जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील सात दिवस पूर्वोत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसासोबतच जोरदार वारं वाहण्याची देखील शक्यता आहे. 6 जुलै पासून ते 12 जुलैपर्यंत नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा या राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. आसाम आणि मेघालयमध्ये देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे पुढील पाच दिवस ओडिशामध्ये तर 9 ते 10 जुलैदरम्यान छत्तीगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दहा जुलैपर्यंत मध्य प्रदेशातीलही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मध्यप्रदेशात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, याच दरम्यान वादळ देखील होणार असून, वाऱ्याचा वेग प्रति तास 30 से 40 किमी इतका राहण्याचा अंदाज आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पावसाची हजेरी 

दरम्यान आज देखील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पाऊस झाला, त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO
मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO.
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा.
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान.
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.