AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीवरील हल्लानंतर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ’16 तारखेनंतर…’

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर आली आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. यानंतर जलील यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

गाडीवरील हल्लानंतर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, '16 तारखेनंतर...'
Imtiyaz Jaleel ReactionImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 07, 2026 | 3:26 PM
Share

ऐन निवडणुकीच्या प्रचारात छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर आली आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. प्रचार सुरु असताना हा हल्ला झाला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केला आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. या हल्ल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

कार्यकत्यांमध्ये हाणामारी

छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुऱ्यात जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. याआधी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. यानंतर कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हल्ल्यानंतर इम्तियाज जलील काय म्हणाले?

इम्तियाज जलील यांनी म्हटले की, ‘राजकारणात असे प्रकार होत असतात. मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही. लोकशाहीने मला कुठही जाण्याचा आणि पदयात्रा करण्याचा अधिकार दिलेला आहे, मी ते करत आहे. आता कुणाला आम्ही इकडे येऊ नये याबाबत आक्षेप असेल, मात्र आमचा उमेदवार आहे त्यामुळे आम्ही प्रचार करत आहोत. आता 16 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की काळ्या झेंड्यांचा अर्थ काय आहे आणि हिरव्या झेंड्याचा अर्थ काय आहे.’

कार्यकत्यांची नाराजी

एका नाराज कार्यकर्त्यांने म्हटले की, नागरिकांचे प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी वॉर्डमध्ये नगरसेवक असायला हवा. मात्र यांनी 10 किलोमीटर दूर राहणारा नगरसेवक दिला आहे. त्यामुळे नागरिकांचा नेत्यांवर राग आहे. त्यामुळे या वॉर्डमधून त्यांना असाच विरोध असणार आहे. त्यामुळे वॉर्डमधील 500 मुलांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.

Follow Us
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा.
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.