AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय करतील नेम नाही ! निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी उमेदवाराचा अतरंगी डाव; स्वत:च्याच घरावर…

जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी शोधमोहिम राबवली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. त्यावेळी तक्रारदाराच्या नातेवाईकाच त्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

काय करतील नेम नाही ! निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी उमेदवाराचा अतरंगी डाव; स्वत:च्याच घरावर...
जळगावमध्ये उमेदवाराचा अतरंगी डाव
| Updated on: Dec 06, 2024 | 1:28 PM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून काल राज्यात सत्तास्थापनाही झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत बरंच राजकीय नाट्यही बघायला मिळालं. मतांसाठी उमेदवारांनी विविध क्लुप्त्या लढवल्या, मात्र जळगावातल्या एका उमेदवाराने तर मात्र हद्दच केली. निवडणुकीच्या मतदानापूर्वी ( 20 नोव्हेंबर) दोन दिवस आधीच जळगावात एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याने खळबळ माजली होती. मात्र या घटनेचा उलगडा झाला असून एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत निवडून येता यावं, निवडणुकीमध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्या उमेदवारानेच आपल्या घरावर गोळीबार करून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमधील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्यासह त्यांच्या 2 मुलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेले दोन जण अद्याप फरार आहेत. तसेच गुह्यातील बंदुकीसह इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

नेमकं काय झाल ?

मिळालेल्या माहितीनुसार, अहमद हुसेन शेख (वय 51) हे जळगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते. 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मतदान झालं तर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागला. मात्र मतदानाच्या 2 दिवस आधी 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारा अहमद शेख यांच्या घरावर गोळीबार झाला होता. दोन गोळ्या लागून त्यांच्या घराच्या खिडकीची काच फुटली होती तर एक गोळी त्यांच्या घराच्या भिंतीवर लागली होती. यामुळे प्रचंड खळबळ माजली.

याप्रकरणी जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी शोधमोहिम राबवली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. त्यावेळी तक्रारदाराच्या नातेवाईकाच त्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांचा मेव्हणा आणि आणखी एका साधीदार याने मालेगावमधून जळगावात येऊन शेख यांच्या घरावर गोळीबार केला आणि ते परत निघून गेल्याचे तपासात उघड झाले.

शेख यांनीच स्वत:च्या घरावर घडवला गोळीबार

पोलिसांनी अधिक तपास केला असता निवडणुकीस उभे असलेले उमेदवार अहमद शेख यांनीच त्यांच्या स्वत:च्या घरावर गोळीबार करवून आणल्याचे समोर आले. निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यासाठी अहमद हुसेन शेख यांनी घरावर गोळीबार करवून घेण्याचे कृत्य केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.