AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : महाराष्ट्रात धो धो पाऊस नाहीच, ज्याची भीती तोच हवामान विभागाचा अंदाज, पुढील..

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. ज्याची भीती तोच इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. राज्यात आता दुष्काळाचे सावट अधिक गडद होताना दिसतंय. त्यातच हा इशारा देण्यात आला.

Weather update : महाराष्ट्रात धो धो पाऊस नाहीच, ज्याची भीती तोच हवामान विभागाचा अंदाज, पुढील..
Maharashtra Weather Update
| Updated on: Sep 08, 2026 | 7:48 AM
Share

राज्यात पाऊस कमी अधिक होताना दिसत आहे. जून महिना तसा कोरडा गेला पण जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. अनेक धरणे भरली. ऑगस्ट महिन्यात राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचे संकट असल्याचे सांगितले जात होते. सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत. अनेक भागात दुष्काळाचे संकट आहे. पावसाची सर्वजण वाट पाहत आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने ज्याची भीती तोच अंदाज वर्तवला आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्‍यता नसल्याचा अंदाज नुकताच भारतीय हवामान विभागाने दिला. एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातील एकूण पावसाची देखील सरासरी कमी राहण्याची शक्यता आहे.

राज्यात मान्सूनचे वारे कमकुवत झाले असून हवेतील आद्रतेचे प्रमाण कमी तसेच राज्यावर कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या बहुतांश भागात हवामान देखील कोरडे राहणार असून एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातील एकूण पाऊसही सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडलाय. 35 दिवसांपासून पाऊस गायब झाला. खरीप पिके करपू लागली आहेत. सिना कोळेगाव धरण 0 टक्क्यावर आले. अनेक धरणांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मराठवाड्यात यंदा पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने जलसंकट गडद होऊ लागले आहे. पिके वाळून चालली आहेत. सलग 35 दिवसांपासून पाऊसच झाला नसल्याने दुष्काळाची छाया दिसून येत आहे.

जलसंपदा विभाग आणि मराठवाडा विभागीय आयुक्तालय यांच्या 7 सप्टेंबर 2026 पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचे प्रमाण घटले असून अनेक प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण साठ्यात मोठी घट नोंदवली गेली आहे. 57.1 टक्के पाऊस; लातूर आणि धाराशिवमध्ये सर्वाधिक तुटवडा बघायला मिळतोय.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात