AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही तो येणारच! मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, पुढील..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला.

आजही तो येणारच! मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, पुढील..
Rain
| Updated on: Apr 09, 2026 | 7:24 AM
Share

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत हजेरी लावताना दिसला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपेक्षाही अधिक काळापासून अवकाळी बरसताना दिसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचेही नुकसान झाले. दरम्यान गेल्या अनेक दिवसानंतर राज्यातून अवकाळीचे ढग कमी झाले आहेत. मात्र, काही भागात आजही पावसाचा इशारा देण्यात आला. आज राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल. दक्षिण महाराष्ट्रात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकणातही उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात अनेक भागात उकाडा वाढल्याचे बघायला मिळेल. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे झाली. महाबळेश्वर येथे नीचांकी 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लातूर, सांगली, धाराशिव येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

लातूर, सांगली आणि धाराशिव येथे सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, पूर्णपणे पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. धुळे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील तब्बल 25000 शेतकऱ्यांचे 14831 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. यात प्रामुख्याने मका आणि कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तब्बल 18 हजार 687 शेतकऱ्यांचे 11,627 हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात गहू आणि हरभरासोबत कांदा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुरज जगताप यांनी दिली.

द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष काढणीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे द्राक्षांची प्रतवारी घसरली असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे प्रतवारी घसरल्याने द्राक्षांच्या दरात तब्बल 40 टक्क्यांची घसरण झाली असून द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त