Mumbai Rain Updates : अतिमुसळधार पावसासोबतच अतिवृष्टीचा इशारा, पुढील 4 दिवस भयंकर, 72 तासात..
Mumbai Rain Updates : राज्यभरात सर्वदूर पाऊस सुरू झाला. त्यामध्येच अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुंबईसह उपनगरांसाठी पुढील 4 दिवस अत्यंत धोक्याची आहेत. अतिमुसळधार पावसासोबतच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.

Mumbai Rain Updates: राज्यात पावसाने थैमान घातले. अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस कोसळत आहे. जून महिना जरी कोरडा गेला असला तरीही जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच पाऊस कोसळत आहे. जोरदार पाऊस बघायला मिळतोय. काल रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला. जून महिना कोरडा गेला तरीही जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पाऊस त्याची भरपाई करताना दिसत आहे. पुढील काही तासात पावसाचा वेग वाढणार आहे. आज काही भागात रेड अलर्टही पावसाचा जारी करण्यात आला. हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. रायगड आणि पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली.
मुंबईसाठी पुढील 4 दिवस धोक्याची असणार आहेत. मुंबईत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यासोबतच अतिवृष्टी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली. राज्यभरात पावसाचा इशारा देण्यात आला. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुंबईत काल रात्रीपासून झालेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे. सखल हिंदमातामध्ये पाणी भरण्यास सुरूवात झाली.
यासोबतच सायन सर्कल येथेही पाणी साचले आहे. पुढील चार दिवसात स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. मुंबईसह उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. 200 मिमी पर्यंत 24 तासात पावसाची नोंद होऊ शकते. पुढील 72 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. केडीएमसीची यंत्रणा हायअलर्टवर आहे. महापौर व आयुक्तांकडून कमांड कंट्रोल सेंटरमधून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
सखल व पूरप्रवण भागांवर विशेष नजर असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे महापालिकेने आवाहन केले. आपत्कालीन मदतीसाठी 0251-2211866 आणि 1800-233-0045 या टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. पुढील 4 दिवस मुंबई, पुणे आणि कोकणात अलर्ट जारी करण्यात आला. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे.
