AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या लाटेसह अवकाळी पावसाचा इशारा, अलर्ट जारी, पुढील 24 तास…

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जारी केला. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे.

थंडीच्या लाटेसह अवकाळी पावसाचा इशारा, अलर्ट जारी, पुढील 24 तास...
Rain
| Updated on: Jan 05, 2026 | 7:37 AM
Share

हवामानातील सततच्या बदलामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होत आहेत. मुंबईत प्रचंड प्रदूषण वाढले असून श्वास घेणेही घातक बनले. सायंकाळच्यावेळी विशेष: मुंबईतील प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केली जात असल्याचा दावा केला जातोय. मात्र, प्रत्यक्षात प्रदूषण वाढतच चाललंय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे थंडीचा अलर्ट दिला असून पारा कमी होतोय. यामुळे राज्यातही शीत लहरी दाखल होत आहेत. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 9.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

भंडारा येथे 10 अंश तापमानाची नोंदले गेले. राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असल्याने गारठाही राहिल. राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्याने तापमानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस येण्याचीही शक्यता काही भागात आहे.

उत्तर प्रदेशचे लोक पुन्हा एकदा दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीच्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये दाट धुके आहे. दिवसभर थंडीही कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान भागात थंडीची वाढताना दिसत आहे. एकीकडे थंडी तर दुसरीकडे पाऊस अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. उत्तरेकडे प्रचंड थंडी असून केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यात संपूर्ण डिसेंबर महिना थंडी कायम राहिली. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार पाऊस झाला. अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. संपूर्ण जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहणार असल्याचे सांगितले जाते. मुळात म्हणजे यंदा देशातच थंडी उशीरा दाखल झाली. नोव्हेंबर महिन्यातपर्यंत पाऊसच सुरू होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून गारठा जाणू लागला. त्यामध्येच सध्या वातावरणात सातत्याने बदल होतोय.

Follow Us
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?