AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, मोठा धोका, तब्बल 5…

IMD warning : राज्यातील हवामानात काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यावर दुहेरी संकट आल्याचे बघायला मिळत आहे. उष्णता वाढत आहे. प्रशासनाने नागरिकांना मोठा इशारा दिला.

मोठी बातमी! राज्यावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, मोठा धोका, तब्बल 5...
IMD warning
| Updated on: Apr 15, 2026 | 1:24 PM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी मोठी माहिती दिली. राज्यात उष्णतेची लाट आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी पार जाण्याचा अंदाज आहे. पुण्यातही उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. फक्त हेच नाही तर राज्यावर दुहेरी संकट आल्याचे बघायला मिळत आहे. पुढील चार दिवसांत राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. एकीकडे पारा वाढत आहे तर दुसरीकडे पावसाचा इशारा देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच राज्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भासह पुण्यातही चाळीशी पार तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने सोलापूर शहर आणि जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. काल जिल्ह्यात 43.2 डिग्री सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. याशिवाय उपाययोजना म्हणून उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलीय.

विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा तीव्र होऊ लागली. नागपूरमध्ये काल 42.2अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतरचा गारवा संपला. दोन दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

पुढील तीन-चार दिवसपर्यंत वातावरण कोरडे व उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने घराबाहेर जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. नंदुरबारमध्ये उन्हाचा तडाखा वाढला तापमान 42 अंशांवर गेले. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरला अवकाळीचा इशारा देण्यात आला. तीन दिवस ऑरेंज-यलो अलर्ट जारी करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असताना छत्रपती संभाजीनगरकरांना आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात 15 आणि 16 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

तर 17 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात अवकाळी पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटनांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...