AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Temperature Today : पुढील 4 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून अजिबात बाहेर..

Maharashtra Temperature Today 27th April 2026 : देशातील तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात सुर्य आग ओकताना दिसत आहे.

Maharashtra Temperature Today : पुढील 4 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून अजिबात बाहेर..
Heat
| Updated on: Apr 27, 2026 | 1:02 PM
Share

देशात तीव्र उष्णतेची लाट आहे. इशान्य भाग वगळता जवळपास राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आले. तब्बल 47. अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या सात जिल्ह्यांमध्ये 46 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावथी येथे 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये 46. अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने आजही अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. आजही उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश पार असेल. वाढत्या उष्णतेमध्ये दक्षता घेण्याकरिता प्रशासनाने काही सुचना जाहीर केल्या. महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी 12 ते 4 घराबाहेर निघणे टाळा.

देशात काल सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात झाली. अकोल्यात काल पारा 46.9 अंश सेल्सिअसवर गेला. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान होते. अकोल्यापाठोपाठ देशात सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा नंबर आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. विदर्भातील चार जिल्ह्यांत पारा 46 अंशांच्या पुढे जाऊन विक्रमी 47 अंश सेल्सिअसकडे जात आहे.

नागपूर आणि चंद्रपूरचा पारा 45 अंशाच्या पुढे गेला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस आणखी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. विदर्भाच्या तापमानात जीवघेणी वाढ झाली. अकोला 46.9, अमरावती 46.8, भंडारा 44.0, बुलढाणा 43.5, चंद्रपूर 44.0, गडचिरोली 44.6, गोंदिया 44.4, नागपूर 45.4, वर्धा 46.4, वाशीम 44.6, यवतमाळ 46.0 याप्रमाणे तापमानाची नोंद झाली.

अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून रविवारी 46.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर एप्रिल महिन्यातील मागील पाच वर्षांतील हे सर्वाधिक तापमान मानले जात आहे. यापूर्वी 2019 मध्ये अकोल्यात एप्रिल महिन्यात 47.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.  दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून आज सोमवारी अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच 26 ते 28 एप्रिल दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला असून, उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे…..!

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली. जिल्ह्याचा पारा तब्बल 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले असून कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोरेगाव पार्क परिसरात तापमान चक्क 43 अंश सेल्सियसवर. पुणे शहरात तापमान चक्क 40 पार गेले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?