भारतीय रेल्वेचेही खासगीकरण होणार का? अखेर रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…
indian railway privatisation: रेल्वेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे परिवर्तन केले आहे. देशात वंदे भारत, वंदे मेट्रोसारख्या नवीन ट्रेन आल्या आहेत. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे जवानांना बुलेप्रुफ जॅकेट आणि इतर सुविधा या मागण्या ही नक्की पूर्ण होणार आहे.

indian railway privatisation: भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर रेल्वेचे खासगीकरण करणार असल्याचा आरोप करण्यात येते. आता नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या विषयावर थेट भाष्य केले आहेत. रेल्वेमंत्री म्हणाले, एक भ्रम निर्माण केला गेला आहे की रेल्वेची खाजगीकरण होणार आहे. पण मी सांगतो असे कधीच होणार नाही.
विरोधकांना ही मी सांगू इच्छितो की राजकारणात कधीही रेल्वे आणि संरक्षण हे विषय आले नाही पाहिजे. रेल्वेची खाजगीकरण होणार आहे, असे सांगितले जाते. परंतु हा निर्णय कधीच होणार नाही. मी संसदेमध्येही हे स्पष्ट केले आहे. देशात १२.५० हजार कोटींचे जनरल कोच करण्याचे काम सुरू आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
काय म्हणाले रेल्वे मंत्री
नाशिकच्या पुण्यभूमी आणि वीर सावरकर यांच्या भूमीत हा कार्यक्रम होत आहे. देशात मागील सरकारच्या ४० वर्षांत रेल्वेत पाहिजे त्या प्रमाणात परिस्थिती बदल झाला नाही. परंतु २०१४ पासून रेल्वेत बदल सुरु झाला. २.५ लाख करोडच्या रेल्वेला बजेटमधून निधी मोदी सरकारने निधी दिला आहे. १० वर्षांत ४० हजार किलोमीटर रेल्वेचा विस्तार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेल्वेत नवनवीन तंत्रज्ञान आले पाहिजे, असा आग्रह असतो. जम्मू काश्मीरच्या रेल्वेमुळे सुरक्षितेत नवीन तंत्रज्ञान आले आहे.
रेल्वेत मोठे परिवर्तन
रेल्वेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे परिवर्तन केले आहे. देशात वंदे भारत, वंदे मेट्रोसारख्या नवीन ट्रेन आल्या आहेत. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे जवानांना बुलेप्रुफ जॅकेट आणि इतर सुविधा या मागण्या ही नक्की पूर्ण होणार आहे. आरपीएफच्या आणि इतर सुविधांसाठी ३५ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे. आरपीएफ डॉग ट्रेनिंग सेंटर सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
