Sambhaji Bhide : इस्लाम धर्म हाच खरा हिंदुस्थानचा शत्रू, संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

Sambhaji Bhide : इस्लाम धर्म हाच खरा हिंदुस्थानचा शत्रू, संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
Image Credit source: TV9

आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं त्यांनी वक्तव्य केल्यानं भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.

सुनिल थिगळे, प्रतिनिधी

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 18, 2022 | 2:04 PM

पुणे : आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं त्यांनी वक्तव्य केल्यानं भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सध्या सर्वत्र पाळला जात असताना संभाजी भिडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुर  (Shirur) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेतले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याच वेळी संभाजी भिडे यांनी त्यांच्या भाषणात हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या नव्या वक्तव्यानं वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालीय. संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे पुण्याच्या शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायेत. याचवेळी त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते यावेळी बोलताना म्हणालेत, ”धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण पाळत आहोत. त्यामध्ये हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आव्हान दडलेलं आहे. आजही औरंगजेब नसला तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतातील मुस्लिम समाजाच्या रुपाने तो शत्रू हिंदू समाजाच्या पुढे उभा ठाकला आहे. देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी ऐन तारुण्यात संभाजी महाराजांनी बलिदान पत्कारले पण धर्म सोडला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळत असताना हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुने छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांना हाल-अपेष्टा सहन करत मरणाला प्रवृत्त करणारा तोच इस्लाम धर्म, मुस्लिम समाज हा खरा कारणीभूत आहे आणि तोच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे. आपणही त्यांच्यापासून सावध राहून त्यांना हिंदू समाजामध्ये पोटतिडकीने झालेल्या बलीदानाचा सूड घेण्याची जसेच्या तसे उत्तर देण्याची ताकद प्रत्येक हिंदू दाखवेल, असा एक दिवस नक्की उगवेल. हीच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील हिंदुची छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली असेल.” असं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यावेळी म्हणाले. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

यापूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्ये

संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ”कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल , सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद, असं संभाजी भिडे म्हणाले होते.

इतर बातम्या

Holi 2022 : रंग खेळण्याच्या अगोदर केसांची अशा प्रकारे घ्या काळजी, रंगामुळे केस खराब होण्याचे राहणार नाही टेन्शन!

18 March 2022 Panchang: 18 मार्च 2022, रंगपंचमीचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कलाकारांनी सेटवर खेळली होळी, रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का ?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें