AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Cold | जगण्याने छळले होते…थंडीच्या कडाक्याने जळगावमध्ये 4 बेघरांचा मृत्यू!

एकीकडे सामान्यांना घर देण्यासाठी सरकार नाना घोषणा करते. मात्र, दुसरीकडे केवळ निवारा नसल्याने थंडीमुळे असे रस्त्यावर कुत्र्या-मांजरांप्रमाणे माणूस मरून पडणे, हे भीषण त्रासदायक वास्तव आहे. हा एक प्रकारचा क्राईम असून, समाजाला त्याचे अपराधित्व नक्कीच टाळता येणार नाही.

Jalgaon Cold | जगण्याने छळले होते...थंडीच्या कडाक्याने जळगावमध्ये 4 बेघरांचा मृत्यू!
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा लाट आली आहे.
| Updated on: Feb 02, 2022 | 4:52 PM
Share

जळगावः ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते…’ सुरेश भटांच्या या ओळीतले नागडे सत्य अखेर समोर आलेच. होय, जळगावमध्ये (Jalgaon) थंडीच्या (cold) भीषण कडाक्याने 4 जणांचा काकडून मृत्यू झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. विशेष म्हणजे हे चारही जण बेघर होते. ते रस्त्याच्या कडेला झोपले होते. मात्र, रात्री तापमान साडेसात अंशापर्यंत खाली गेले. त्यात सुटलेले बोचरे वारे. यामुळे या चारही जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. एकीकडे सामान्यांना घर देण्यासाठी सरकार नाना घोषणा करते. मात्र, दुसरीकडे केवळ निवारा नसल्याने थंडीमुळे असे रस्त्यावर कुत्र्या-मांजरांप्रमाणे माणूस मरून पडणे, हे भीषण त्रासदायक वास्तव आहे. यापासून सरकार आणि आपण समाज म्हणून काही बोध घेणार का, हा प्रश्नय. हा एक प्रकारचा क्राईम असून, एक संसस्कृत समाज म्हणून हे अपराधित्व आपल्याला नक्कीच झटकता येणार नाही.

भीक मागून खायचे

उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट सुरूय. त्यात नाशिक, जळगाव, धुळे येथील तापमान कमालीचे घसरत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवारा नसलेल्यांचा प्रश्न अग्रक्रमावर आलाय. राज्यभरातील अनेक शहरात अनेक ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली, बस स्टँडवर आणि वेगवेगळ्या चौकात असे बेघर झोपलेले पाहायला मिळतात. मात्र, या थंडीने त्यांचा घात होत असल्याचे समोर आले आहे. जळगावमध्ये मृत पावलेले चारही जण भीक मागून उदरनिर्वाह करायचे. त्यातील एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौक, एकाचा मृतदेह निमखेडी रस्त्यावर, एकाचा मृतदेह रेल्वे स्टेशनवर तर एकाचा मृतदेह जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. या चारही जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अजून त्यांची साधी नावे सुद्धा प्रशासनाला कळू शकली नाहीत.

अंगावर पांघरुण नाही…

मृत पावलेले चारही जण रस्त्याच्या कडेला झोपले होते. सोमवारी मध्यरात्री तापमान साडेसात अंशावर गेले. मात्र, त्यात सुटलेले बोचरे वारे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या सामान्यांच्य अंगावरही काटा येत होता. या चौघांच्या अंगावर साधे पांघरुणही नव्हते. या थंडीमुळेच त्यांचा गारठून मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, शवविच्छेतदनानंतर अजून काही कारण समोर येऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

4 फेब्रुवारीला पुन्हा थंडी

सध्या कमाल तापमान वाढले असले, तरी किमान तापमानात घट होताना दिसतेय. शिवाय येत्या 4 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा थंडीची लाट येईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी काळजी घ्यावी. जास्त थंडी वाजू नये म्हणून टोपी आणि अंगात स्वेटर घालावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.