AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एका रामायणात सीता रामाला शिव्या देते’, भालचंद्र नेमाडे यांचं वक्तव्य

"राम म्हणजे 60 हजार वर्षांपूर्वीचा धनुष्यबाण युद्धस्थानाचा तो नायक. त्याचं अनेक युगांपासून बदलत बदलत वाल्मिकीच्या काळात आता आपल्याला माहिती आहे की नाही, वाल्मिकी श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. श्रृंगांना आवडेल तसं त्याने रामायण लिहिलं. श्रृंगांनी बौद्ध धर्माचा नाश केला", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

'एका रामायणात सीता रामाला शिव्या देते', भालचंद्र नेमाडे यांचं वक्तव्य
| Updated on: Jan 17, 2024 | 10:37 PM
Share

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 17 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. त्यामुळे रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण अशा वातावरणात आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण आणि प्रभू रामांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “अनेक रामायणांमध्ये राम वेगळा आहे. एका रामायणात तर चक्क राम आणि सीता हे बहिणी-बहिणी आहेत. वाल्मिकीचा राम कशामुळे खरा म्हणायचा? वाल्मिकी हा श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जसं आवडलं तसं रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं. तसेच राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? ते खोलात जावून शोधलं पाहिजे. एका रामायणात तर सीता ही रामाला अक्कल नाही, अशा शिव्या देते”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले आहेत. जळगावातील भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

“खोट्याला किंमत नाही. लेखकाने जे सत्य आहे ते नीट तपासून पाहावं. त्याचेही दोन प्रकार असतात. दिसणारं सत्य आणि न दिसणारं सत्य. लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे. हे खोटं बोलत आहेत, राम मांसाहारी होता की शाकाहारी होता? आता हे वाचूनच लक्षात येतं ना, कशाकरता त्याची चर्चा करायची? त्यामुळे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खोदून पाहा, मग कळेल खरं काय आहे ते. नुसतंच टीव्ही, भाषणं, चर्चा वगैरे भानगडीतून सत्य सापडणार नाही. प्रत्यक्ष जावून शोधणं महत्तावचं आहे की, हे खरोखरंच आहे का? त्यात पुन्हा एकच रामायण आहे का? आमचे मित्र रामानुंज यांनी टू हन्डरेड रामायण हे पुस्तक लिहिलं आहे. ते बंद पाडलं. कशामुळे?”, असा सवाल भालचंद्र नेमाडे यांनी केला.

‘काही ठिकाणी राम आणि सीता हे बहिणी-बहिणी’

“चंगनिश खान होता, त्याला रामायण अत्यंत आवडतं होतं. ते मी ब्रिटियश म्युझियममध्ये एकदा पाहिलं, तर त्यातला राम वेगळाच आहे. नंतर इकडे कंबोर्डियातला राम वेगळाच आहे. जैन रामायणातला राम वेगळा आहे. काही ठिकाणी राम आणि सीता हे बहिणी-बहिणी आहेत. सीता ही रावणाची मुलगी आहे”, असा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला.

‘वाल्मिकी श्रृंग घराण्याचा दरबारी कवी, श्रृंगांनी बौद्ध धर्माचा नाश केला’

“राम म्हणजे 60 हजार वर्षांपूर्वीचा धनुष्यबाण युद्धस्थानाचा तो नायक. त्याचं अनेक युगांपासून बदलत बदलत वाल्मिकीच्या काळात आता आपल्याला माहिती आहे की नाही, वाल्मिकी श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. श्रृंगांना आवडेल तसं त्याने रामायण लिहिलं. श्रृंगांनी बौद्ध धर्माचा नाश केला. बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातील सर्वात जुने, सर्वात सामाजिक, अहिंसक असे धर्म, त्यांचा नाश करणारे हे श्रृंग आणि आपल्याकडचे शालिवान. त्यांनी नाश केला आणि ब्राह्मण धर्म प्रस्थापित केला”, असं नेमाडे म्हणाले.

‘आसामच्या रामायणात सीता रामाला शिव्या देते’

“आता अशी परिस्थिती होते की, खरा कोणता राम म्हणायचा, वाल्मिकी राम खरा म्हणायचा? वाल्मिकीच्या आधी मी आसाममध्ये एका समूदायाचं रामायण पाहिलं. त्या समूदायाचे आता 15 हजार लोकं राहिले आहेत. त्यांच्यातला राम वेगळा. त्यांच्यात सीता मुख्य, ती रामाला आज्ञा देत असते, रामाला शिव्या देत असते. तुला अक्कल नाही वगैरे असं. ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषेमध्ये”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

“थोडक्यात म्हणजे जैन धर्मीय लोकांचं रामायण का खरं नाही? आणि कंबनाचं रामायण का नाही खरं? सगळेच रामायण माहिती पाहिजेत. नुसतंच एक रामायण नाहीय. आणि तुवंडे रामायण लोकांना का वाचू देत नाही?”, असा प्रश्न भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.