Eknath Khadse : खडसे मातब्बर नव्हे तर भिक्कार XX नेता… भाजप आमदाराची जीभ घसरली
एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या शीतयुद्ध सुरू असतानाच अजून एका भाजप आमदाराने या वादात उडी घेतली. खडसेंवर टीका करताना पण आमदारांना भान राहिले नाही. त्यांची जीभ घसरली, काय केली त्यांनी टीका?

खानदेशमध्ये गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे सातत्याने चर्चेत आहे. खडसे आणि महाजनांमधील विळा-भोपळ्याचे युद्ध तर जगजाहीर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात शिलगली आहे. एकमेकांवर सडकून टीका करत असतानाच दोन्ही नेत्यांनी राजकीय शालिनता दाखवली आहे. पण आता या वादात खानदेशमधील भाजपच्या एका आमदाराने उडी घेतली आहे. खडसेंवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे.
खडसे मातब्बर नव्हे, भिकारXXX
मंत्री गिरीश महाजनांवर एकनाथ खडसेंकडून सुरू असलेल्या आरोपावरून आमदार मंगेश चव्हाण यांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल चढवला. एकनाथ खडसे मातब्बर नव्हे तर भिकार… नेता असल्याची टीका चव्हाण यांनी केली. एकनाथ खडसेंचा बुरखा आम्ही पत्रकार परिषदेतून सर्वांसमोर आणू, असा इशारा आमदारांनी दिला. अर्ध्या माहितीच्या आधारे एकनाथ खडसे हे नेत्यांची बदनामी करून जिल्ह्याचे नाव बदनाम करत आहेत. याबाबत पत्रकार परिषदेतून सविस्तर भूमिका मांडू असे चव्हाण म्हणाले.
तर आमच्याकडे योग्य गोळ्या
योग्य वेळ आल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी योग्य गोळ्या दिल्या जातील, असा चिमटाही मंगेश चव्हाण यांनी काढला. खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत. गिरीश महाजरांची बरोबरी ते करू शकत नाही. गिरीश महाजन यांनी कामातून आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. मी पणाच्या अहंकारात खडसेंनी बरीच वर्ष घातली. चाळीस वर्षे राजकारणात त्यांनी जे काम केलं ते स्वतःसाठी आणि परिवारासाठी, पक्षाचे खडसे कधीही झाले नाही खडसे गेल्यापासून पक्षाची एक हाती सत्ता यायला सुरू झाली, असा परखड मत चव्हाण यांनी मांडले.
एकनाथ खडसे हे सपाट पावले
खडसेंना कोणी आडवा आलं कायम त्यांनी त्याला आडवं केलं. एकनाथ खडसे खरंच आपल्या आईचं दूध पिले असतील तर त्यांनी सर्व पुरावे जनतेसमोर आणावे. एकनाथ खडसे यांनी जेवढे आरोप केले ते एकही सिद्ध करू शकले नाही. एकनाथ खडसे म्हणजे तत्कालीन तोडीपाणी विरोधी पक्षनेता आहे, असे शरद पवार आणि राज ठाकरे यांचे शब्द आहेत. एकनाथ खडसे हे सपाट पावले आहे. एकनाथ खडसे यु टर्न करणारा सरडासारखा माणूस आहे, अशी घणाघाती टीका मंगेश चव्हाण यांनी केली.
प्रफुल्ल लोढा चे प्रकरण वेगळा आणि हनी ट्रॅप प्रकरण वेगळा दिसते. मात्र तुमच्या कडे पुरावे असतील तर ते मांडावे. प्रफुल्ल लोढाचे प्रकरण हनी ट्रॅपचा प्रकार नसून बलात्काराचा प्रकार आहे. 17 वर्षाची मुलगी हनी ट्रॅप मध्ये कशी इन्व्हॉल असेल? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. प्रफुल्ल लोढाचे प्रकरण वेगळे आहे आणि एकनाथ खडसे जे हनी ट्रॅप प्रकरण सांगतात ते कथोकाल्पित आहे एकनाथ खडसेंना कोणीही विचारत नाही त्यामुळे ते अशा पद्धतीने सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला.
