‘किती वेळा नवरे बदलले तू आणि कुणाला बोलतो?’, एकनाथ खडसे प्रचंड संतापले

एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली. खडसे हे रंग बदलणारे प्राणी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी आज सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

'किती वेळा नवरे बदलले तू आणि कुणाला बोलतो?', एकनाथ खडसे प्रचंड संतापले
एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 7:49 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे भाजप पक्षात जाण्यास इच्छुक आहेत. पण त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रखडला आहे. एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर येऊन भाजपला इशारा दिला आहे. आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लवकर घेतला नाही तर आपण राष्ट्रवादीतच काम करु, असं खडसे म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. “हे सरपटणारे, रंग बदलणारे प्राणी”, अशी खोचक टीका मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या टीकेला खडसेंनी सडतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे नीतीमत्ता तरी आहे का? चंद्रकांत पाटील हा शिवसेनेचा अध्यक्ष होता. निवडणुकीमध्ये तो अपक्ष उभा राहिला. त्यानंतर शरद पवार यांच्या मदतीने निवडून आला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये तो उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला. कालांतराने पुन्हा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. किती वेळा नवरे बदलले तू आणि कुणाला बोलतो?”, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

‘सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो?’

“राष्ट्रवादीच्या जीवावर आमदार झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे गेला. आता म्हणतो मी शिंदेंचा आहे. त्यामुळे सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो?”, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वाद हा सर्वश्रूत आहे. त्यांच्यात सातत्याने वाद होत असतात. चंद्रकांत पाटील हे एकनाथ खडसे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशी राजकीय वर्तुळात नेहमी चर्चा असते.

‘माझे पूर्वज श्रीमंत होते, याच्यासारखे भंगार विकणारे नव्हते’

एकनाथ खडसे यांनी यावेळी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिलं. “जिल्हा दूध संघाच्या कारभाराबद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. त्याचे उत्तर द्या ना आधी. जर तुम्ही फायद्यामध्ये आहात तर दुधाचा भाव शेतकऱ्यांना का वाढवून देत नाही? जर तुम्ही फायद्यामध्ये आहेत तर अनेक घोटाळे झालेले आहेत, त्याची चौकशी तुम्ही का करत नाहीत? मी लक्ष्मी पुत्र होतो. माझे पूर्वज श्रीमंत होते. याच्यासारखे भंगार विकणारे नव्हते”, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी मंगेश चव्हाण यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.