Girish Mahajan : मी तुमच्या सारख्या चोऱ्या माऱ्या केल्या नाही…गिरीश महाजनांची राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यावर बोचरी टीका
Girish Mahajan Criticize : नाशिकच्या पालकमंत्री पदाचे गुऱ्हाळ लांबतच चालले आहे. त्यातच हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा मंत्रिपद आल्याने कुंभमेळ्यापूर्वी पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच महाजनांनी अजून एका बड्या नेत्याला लक्ष केले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर तुफान फटकेबाजी केली. त्यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर त्यांना शुभेच्छा दिल्या. तर उद्धव ठाकरे यांनीच युतीधर्म पाळला नसल्याचे स्पष्ट केले. युतीमध्ये आम्ही सोबत निवडणूक लढवली. आमचं बहुमत आलं आणि हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले.. पवारांच्या मांडीवर जाऊन बसले असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. त्यांनी छगन भुजबळ यांना कालपरवा चिमटा काढल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यावर बोचरी टीका केली.
एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका
मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली. तुमच्याकडे चाललेले आहे ते सावरा मी तर काही तुमच्या सारख्या चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत. तुम्ही काय काय केलेल आहे हे सर्वांना माहित आहे. मी महामार्गावर जागा घ्यायची आणि मुरूम चोराच्या गोष्टी कधीच करत नाही, अशी बोचरी टीका महाजनांनी खडसेंवर केली.
ते तर दिल्लीत लोटांगण घालतात
यावेळी खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सुद्धा त्यांनी जहरी टीका केली. त्या मीटिंगमध्ये गडकरी साहेब काय बोलले ते सांगू का म्हणा? असा सवाल त्यांनी केला. संपूर्ण राज्याला माहिती आहे जगाला माहिती आहे की कोण जेलमध्ये गेल्यावर दीड वर्ष कोण मध्ये राहिले. सर्वांना माहिती आहे की कोण दिल्लीला गेले, कोण दिल्लीला जाऊन लोटांगण घालून माफ्या मागत आहे. या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला जोरदार प्रति उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री दिलदार
यावेळी त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देत पवारांना शुभेच्छा दिल्या. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. त्यावर मत व्यक्त केले. कौतुक केले आहे तर चांगले आहे, आमचे मुख्यमंत्री फार दिलदार आहेत. त्यांनी त्यांचं कौतुक केलं तर वाईट काय, असे ते म्हणाले.
