AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon | अन् काही क्षण सर्वांनीच रोखला श्वास! जळगाव रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांमध्ये अडकले प्रवासी

Jalgaon | जळगाव रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला. दोन दिवसांपूर्वीच चालत्या रेल्वेतून उतरताना रेल्वेखाली ओढल्या गेलेल्या तरुणाला त्याचे दोन पाय गमवावे लागले. तर एका रेल्वेतून आउटर साईडने उतरल्यानंतर दुसऱ्या बाजूने रेल्वे आल्याने त्या कुटुंबाचा एकदमच गोंधळ उडाला. बघ्यांचा पण काळजाचा ठोका चुकला.

Jalgaon | अन् काही क्षण सर्वांनीच रोखला श्वास! जळगाव रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांमध्ये अडकले प्रवासी
अन् काळजाचा ठोका चुकला Image Credit source: फाईल फोटो
| Updated on: Mar 06, 2024 | 2:23 PM
Share

किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,जळगाव | 6 March 2024 : रेल्वे स्थानकावर प्रवाशांना त्यांचा हलगर्जीपणा, अतिघाईचा फटका बसतो. दोन दिवसांपूर्वीच जळगाव रेल्वे स्थानकावर एका तरुणाला दोन पाय गमवावे लागले. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. तर तर एका रेल्वेतून आउटर साईडने उतरल्यानंतर दुसऱ्या बाजूने रेल्वे आल्याने त्या कुटुंबाचा एकदमच गोंधळ उडाला. हे कुटुंब दोन धावत्या रेल्वेंच्या मधात अडकले. यावेळी बघ्यांचा पण काळजाचा ठोका चुकला. पण नशीब बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

काय ओढावला प्रसंग

जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी थांबल्यानंतर आऊटर साईडने दोन लहान मुलांसह काही प्रवासी उतरले. रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर शॉर्टकट जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तेवढ्यातच दुसरी रेल्वे आली. एकदमच दुसरी रेल्वे आल्याने त्यांचा मोठा गोंधळ उडाला. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. दुसऱ्या बाजूने धावत्या रेल्वेच्या मधात हे प्रवासी अडकले. हे प्रवाशी जागेवरच खिळले. त्यामुळे त्यांच्यावर संकट ओढावले नाही. हे पाहून प्रवाशांनी गोंधळ केल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे जवान धावून आले. त्यांनी मदतीऐवजी संताप व्यक्त केला.

लहान मुलांना दुसऱ्या रेल्वेत चढवले

ही घटना अगदी काही क्षणातच घडली. पण मुलांना वाचविण्याच्या हेतूने आई-वडिलांनी मुलांना ज्या रेल्वेतून उतरले. त्यात पुन्हा चढवले आणि दोन महिला आणि इतर प्रवाशी तिथेच खाली बसले. या सर्व प्रकारामुळे मुले भांबवली. तर प्रवाशांनी आरडाओरड केली. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलातील जवान धावून आले. त्यांनी या प्रकाराबद्दल प्रवाशांवर आरडाओरड करत संताप व्यक्त केला.

तर घडली असती मोठी दुर्घटना

रेल्वेने रुळ क्रॉस करण्याचा प्रयत्न केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. याच दरम्यान रेल्वे स्थानकावरील वीज सुद्धा काही काळासाठी बंद झाल्यामुळे गोंधळ वाढला. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. दोन्ही गाड्या गेल्यानंतर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. तसेच त्यांचे साहित्य सुद्धा प्लॅटफॉर्मवर देण्यात आले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवासी शॉर्टकट वापरतात मात्र शॉर्टकट त्यांच्या जीवावर भेटू शकतो त्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून रेल्वे रूळ पार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा