मुलाच्या लग्नात मंत्री गुलाबराव पाटलांनी धरला ठेका, जळगावात आज आणखी एक जंगी विवाहसोहळा!

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पाडला. यावेळी विविध राजकीय पक्षांनी हजेरी लावली होती. जळगावातदेखील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. चोपडा तालुक्यातील साईबाबा मंदिरात होणाऱ्या या लग्न समारंभात सोमवारी मातब्बर नेत्यांची उपस्थिती आहे.

मुलाच्या लग्नात मंत्री गुलाबराव पाटलांनी धरला ठेका, जळगावात आज आणखी एक जंगी विवाहसोहळा!
मुलाच्या लग्नात गाण्यावर ठेका धरताना मंत्री गुलाबराव पाटील

जळगावः राज्यात शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच जळगावातील आणखी एका बड्या प्रस्थाच्या घरी विवाह सोहळा संपन्न होत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil)  यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम (Vikram) यांचा आज विवाह सोहळा पार पडत आहे. चोपडा तालुक्यातील सनफुले गावातील भगवान भिका पाटील यांची कन्या प्रेरणा हिच्यासोबत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव यांनी अहिराणी भाषेतील गाण्यावर ठेका धरला.

हळदीच्या कार्यक्रमात मंत्र्यांनी धरला ठेका

जळगाव लग्नसोहळा नृत्य , गाणे वाजवणे आलंच. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही रविवारी आपल्या लहान चिरंजीवाच्या लग्नसोहळ्यानिमित्ताने हळदीच्या कार्यक्रमात ठेका धरत सर्वांचेच लक्ष वेधले. अहिराणी भाषेतील गीतांवर नृत्य करणाऱ्या पालकमंत्र्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Vikram Patil- Prerna

गुलाब राव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम पाटील व सून प्रेरणा

पाळधी येथील साईबाबा मंदिरात विवाहसोहळा

गुलाबराव पाटील हे शेतकरी कुटुंबात वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाची त्यांना विशेष जाणीव आहे. गुलाबराव पाटील यांच्या होणाऱ्या सुनेचे वडील भगवान पाटील हे यात्रा केबल्स कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. तसेच घरची शेतीसुद्धा तेच सांभाळतात. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील ही मुलगी आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा हा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पाडणार आहे. चोपडा तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिरात हा विवाह सोहळा पार पडणार असून यावेळी विविध मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.

इतर बातम्या-

एकतर्फी प्रेमातून बलात्कार, तरुणीसह कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

उद्घाटनाचपूर्वीच कोराडीतील महामार्ग सुरू, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हटविले बॅरिकेट्स, उड्डाणपूल तयार होऊन झाला होता महिना

Published On - 12:51 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI