Jalgaon Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याचा नवीन रेकॉर्ड, मिळाला आजपर्यंतचा विक्रमी भाव

Gold Silver Rate Today : देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याला आजपर्यंतचा विक्रमी भाव मिळाला. सोन्याने पुन्हा जोरदार मुसंडी मारली. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम दिसून आला. या दरवाढीने ग्राहकांना मोठा झटका बसला.

Jalgaon Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याचा नवीन रेकॉर्ड, मिळाला आजपर्यंतचा विक्रमी भाव
सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 5:22 PM

देशातील सुवर्णपेठ, जळगावमध्ये सोन्याने जोरदार मुसंडी मारली. सोन्याचा भाव गगनाला पोहचला. मध्य-पूर्वेत इस्त्राईल आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे. इराणच्या हल्ल्याला इस्त्राईलने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोने-चांदी वधारले आहेत. त्याचा थेट परिणाम आज, 20 एप्रिल 2024 रोजी सुवर्णनगरीत दिसला. सोन्याच्या किंमतींनी सराफा बाजारात 76 हजारांचा आकडा ओलांडला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. काही ग्राहकांनी खरेदीचा बेत पुन्हा रद्द केला.

हा तर विक्रमी भाव

देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. सुवर्णनगरीत आजपर्यंतचा सर्वात विक्रमी भाव सोन्याला मिळाल्याचे सराफा व्यवसायिकांनी सांगितले. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव 74 हजार 100 रुपये एवढे आहेत. जीएसटी सह हे भाव 76 हजार 300 रुपये एवढे असून आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याने 76 हजारांचा आकडा पार केला आहे.तर दुसरीकडे चांदीने सुद्धा 85000 चा आकडा पार केला आहे. जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह चांदीचे दर हे 85 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचा सराफ व्यावसायिक यांचं म्हणणं आहे

हे सुद्धा वाचा

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 73,404 रुपये, 23 कॅरेट 73,110 रुपये, 22 कॅरेट सोने 67,238 रुपये झाले. 18 कॅरेट 55,053 रुपये, 14 कॅरेट सोने 42,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 82,853 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

दरवाढीची काय आहेत कारणं

  1. सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेच्या केंद्रीय बँक, युएस फेडने व्याजदरात कपात केली
  2. जगात दोन ठिकाणी युद्ध सुरु आहे. तर इराण-इस्त्राईल तणाव वाढला आहे.
  3. चीनने चांदीची आक्रमकपणे खरेदी सुरु केलेली आहे.
  4. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरु आहे.
  5. भारतीय रुपयांचे अवमूल्यन हा मोठा घटक या दरवाढीला कारणीभूत ठरला आहे.
  6. डॉलरच्या तुलनेत रुपयांने नांग्या टाकल्याने चढ्या दराने मौल्यवान धातूची खरेदी करावी लागत आहे.
  7. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी आक्रमकपणे सुरु केली आहे.
Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.