Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचे पैसे देतो कोण? दाढीवाल्या बाबाचे नाव घेत गुलाबराव पाटलांचा मोठा दावा, महायुतीला बसणार हादरा?
Gulabrao Patil On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे कवित्व अजूनही संपलेले नाही. महायुती सरकार सत्तेवर येऊन आता बराच काळ लोटला. पण लाडक्या बहिणीवरून श्रेय वाद काही सुटला नाही. मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर मोठा दावा केला आहे.

लाडकी बहीण योजनेचे कवित्व आणि वाद अजून संपलेला नाही. मत पुरते भाऊरायाचे प्रेम होते, आता विविध निकष लावून बहिणींना योजनेतून खड्या सारखे बाजूला करण्यात येत असल्याचा आरोप विरोध करत आहेत. तर दुसरीकडे महायुतीमधील नेत्यांचे या योजनेवरून सुरू असलेली श्रेय वादाची लढाई संपलेली नाही. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने श्रेयवादीची लढाई संपली नसल्याचे दिसून येत आहे.
दाढीवाला बाबा देतो पैसे
लाडकी बहीण योजनेचे पैसे एकनाथ शिंदे यांनी सुरू केले, असे सभासद नोंदणी करताना महिलांना सांगा, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. आपला दाढीवाला बाबा म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतात असा गुलाबराव पाटील यांचा दावा आहे. जळगावमधील मेळाव्यात त्यांनी या योजनेचे श्रेय शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांचे असल्याचा एक प्रकारे दावा केला आहे.




पुरुषांपेक्षा महिलांनी ठरवलं तर महिला आघाडीची नोंदणी पुरुषांपेक्षा जास्त होऊ शकते. सभासद नोंदणी करताना एवढेच सांगा की ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले त्या एकनाथ शिंदे त्यांचा हा पक्ष आहे, असा सल्ला द्यायला सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील विसरले नाहीत. पक्ष सदस्य वाढवण्याचा हा मंत्र कार्यकर्त्यांना लागू होईल अशी आशा त्यांना आहे. जळगावच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकार्यांना त्यांनी सभासद नोंदणीचे आवाहन केले.
बायकोने हात लावला तरी नमस्कार
इंग्रजांच्या काळात जसं एक अफवा पसरवणारा खात होतं तसेच अफवा निवडणुकीत लोकांनी पसरवल्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लोकांनी मी निवडून येणार नाही अशा अफवा पसरवली होती. गुलाबराव पाटलांचा काही खरं नाही…मराठा बौद्ध मुस्लिम समाज मला मतदान करणार नाही अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या, असे पाटील म्हणाले.
यामुळे मला सुद्धा रात्र रात्रभर झोप लागायची नाही. बायकोने जरी हात लावला तरी मी उठून तिला नमस्कार करायचं की लक्ष ठेवजो, असा किस्सा पाटलांनी सांगताच एकच हाश्या पिकला. निवडून आल्यानंतर लोकांनी प्रचार केला की निवडणुकीत गुलाबराव पाटलांनी अमाप पैसा चालवला. मात्र सर्व समाजाच्या लोकांनी जवळपास 45% मतदान करून हे सिद्ध करून दिलं की कामाच्या पुढे समाज चालत नाही. माझ्याकडे कुठला समाज नाहीये जो काम करेगा वही मेरा समाज आहे असे ते म्हणाले. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून माझी अपेक्षा खूप आहे. तुम्ही निवडणुकीची जनता करू नका तुम्ही फक्त समाजाची कुस्ती करा. आणि माझी कॉलर टाईट करा, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.