AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना बावनकुळे, ना एकनाथ शिंदे, नाथाभाऊंनी सांगितले नाव तिसरेच… ही व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत…म्हणाले त्यांना फडणवीसांचा आशीर्वाद

Eknath Khadse on Girish Mahajan: देवेंद्र फडणवीस दिल्ली गेले तर या निबंधलेखन मालेत आता अजून एका तिसऱ्या व्यक्तीच्या नावाची एंट्री झाली. राऊतांनी निंबधात चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेतले. बच्चूभाऊंनी अर्थात शिंदेंचे नाव रेटले. तर आता नाथाभाऊंनी तिसरेच नाव या शर्यतीत आणले आहे.

ना बावनकुळे, ना एकनाथ शिंदे, नाथाभाऊंनी सांगितले नाव तिसरेच... ही व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत...म्हणाले त्यांना फडणवीसांचा आशीर्वाद
एकनाथ खडसे, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे
| Updated on: Jul 12, 2026 | 8:45 AM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: एकनाथ खडसे यांच्या दिल्लीवरीने भाजपमध्ये अनेक चर्चा झडत आहेत. भाजपमधून राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजपमध्ये जाण्याची त्यांची इच्छा पाहता येत्या काही दिवसात मोठा बदल दिसू शकतो. खडसे यांनी गेल्यावर्षी सुद्धा भाजपच्या शीर्ष नेत्यांची भेट घेतली होती. त्यांच्या घरवापसीच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ताज्या भेटीने या चर्चांना पुन्हा हवा मिळाली. या भेटीवर खडसे यांनी जाहीर वक्तव्य केले. त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन यांना चिमटा काढायला ते विसरले नाहीत. महाजन हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा नाथाभाऊंनी केला. कालच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचे (Ekanth Khadse on Devendra Fadnavis) नाव पुढे केले होते. बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री असे सूतोवाच केले होते. तर नाथाभाऊंनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत महाजनांनी समोर आणत या पदासाठी अजून एक दावेदार असल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तिसरा चेहरा

मुख्यमंत्री पदाची अचानक चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे सेनेकडून वारंवार करण्यात येत आहे. फडणवीस हे पंतप्रधानाचा चेहरा असतील असा त्यांचा दावा आहे. फडणवीस यांच्यानंतर राज्यात चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य काल खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांनी महाजन हे मुख्यमंत्री होऊ शकणार नाही असेही म्हटले होते. तर आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून राज्याची धूरा सांभाळतील असे म्हटले होते.

शहांनी दिल्लीला बोलावलं

“मी स्वतःहून दिल्लीला गेलो नाही. अमित शाह यांनी मला दिल्लीत बोलावले. काय काम आहे हे मला माहिती नव्हतं. गेलो तेव्हा त्यांनी मला भाजपमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर नड्डा यांच्याकडे पाठवले. मला भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाही. मी शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे आणि भविष्यातही त्यांच्यासोबत राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत हे मी अमान्य करणार नाही.” अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

गिरीश महाजन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत

तर गिरीश महाजन हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत, त्यांच्या मतदारसंघात तशा आशयाचे बोर्डही लागलेले होते असा दावा नाथाभाऊंनी केला. एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय असा टोलाही त्यांनी लगावला. गिरीश महाजन यांना मंत्री होईपर्यंत सर्वतोपरी मदत केली. माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीची सांगता होत नव्हती. असा दावाही खडसे यांनी केला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ