Manoj Jarange : पंकजा मुंडे यांच्या त्या विधानानंतर मनोज जरांगे यांचा पहिल्यांदाच एका ओळीत इशारा… काय म्हणाले जरांगे?
Manoj Janrange on Pankaja Munde : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात दंड थोपाटले आहेत. तर ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावर जरांगे यांनी एका ओळीत असा इशारा दिला.

मराठा आरक्षण जीआरवरुन राज्यात वातावरण तापले आहे. अनेक ओबीसी नेते मराठा शब्दाला हरकत घेत आहेत. यामुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात येईल असा त्यांचा दावा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात दंड थोपाटले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांनी बोगस प्रमाणपत्राविषयी सूतोवाच केले. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एका ओळीत असा इशारा दिला.
छगन भुजबळांवर जहरी टीका
जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. त्यांचं तेच काम आहे. ते म्हणजे सरकारला आणि फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे काम भुजबळ करत आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. मराठ्यांच्या आणि सरकारचे मन जुळले नाही पाहिजे हे काम ते प्रमुख करत आहे. मराठ्यांचे आणि सरकारचे मनोज उले तर त्यांचं भागणार नाही म्हणून ते असं करत आहे त्याला फक्त राजकीय पद लागत आहे ओबीसीच्या नावाखाली, अजून काही लागत असेल, असा गंभीर आरोप जरांगेंनी भुजबळांवर केला.
परंतु हा डाव आता देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेला आहे, फक्त स्वार्थासाठी भुजबळ ओबीसी ओबीसी करत आहेत आणि आपल्यापासून बाकीच्या जाती तोडायचं काम करत आहेत. त्यामुळे आमच्या जीआरला काहीही होऊ शकत नाही. आम्ही खूप रक्त जाळून हा जीआर आणलेला आहे. त्यामध्ये काही फेरफार करून बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करोडोंच्या संख्येने रस्त्यावर दिसणार आहेत, असा इशारा पाटील यांनी दिला. यापुढे जशास तसे उत्तर मिळणार आहे असा देखील इशारा जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला.
मराठ्यांनी सावध होणं गरजेचं
पंकजा मुंडे काय बोलल्या, हे मी ऐकलेलं नाही, परंतु मला वाटत नाही की त्या असं बोलतील म्हणून, जर बोलल्याच असतील तर मराठ्यांना सावध होणं गरजेचं आहे, असे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले. मराठ्यांना ज्या माणसांसाठी तुम्ही धरपड्या मारल्या ज्यांचे राजकीय करिअर मोठा होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही मराठा जातीच्या मराठी असून सुद्धा मराठी जातीच्या विरुद्ध जाता तेच माणसं जर कुणबी प्रमाणपत्र निघाले असतील आणि त्याच प्रमाणपत्रावर गोरगरीब लेकरांच्या मुळावर घाव घालायचा प्रयत्न करत असतील तर हे अवघड आहे, असे जरांगे म्हणाले.
तर मग जशाच तसं उत्तर
परंतु माझा विश्वास अजूनही बसत नाही की त्या मराठ्यांविषयी बोलल्या असतील. त्या जर बोलले असतील आणि ते सत्यच असेल तर आम्हाला सुद्धा तशाच तसे उत्तर द्यावं लागेल, जशास तसे बोलावं आणि वागावं लागणार आहे त्याला आमचा नाईलाज आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठ्यांनी आता रोख ओळखावा आणि जात ओळखावी जातीचे नेते पण वाचवावे यासाठी मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावे. कारण शेवटी मराठ्यांची बाजूवाली आणि समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात. आपलीच मतं घेऊन आपल्या विरोधात विष घालवण्याचे काम करत आहे. मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा नेत्यांनी आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी आता विचार करणे गरजेचे आहे. की तुमच्यासाठी आता जात महत्त्वाची आहे.
जात जातीची लेकरं आणि तो जीआर जिवंत ठेवून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकजुटीने एक बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे.आपलं खरे आरक्षण असून हे जर बोगस म्हणणारे असेल तर हे बोगस आरक्षण 16 टक्के खात आहे आणि वर्ष 2% 50% च्या वरील हे सुद्धा बोगस खात आहेत. आपल्याविषयी सरकारच्या नोंदी दस्तऐवज मधील असतील तर मात्र आता विचार करायची वेळ आहे. कारण ते सुद्धा आता बोगस आरक्षण खात आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला आवाज उठवा लागणार आहे.
आता टोकाची लढाई लढण्याची वेळ
1994 मध्ये 16 टक्के आरक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर 50% च्या वर सुद्धा दोन टक्के घेतलं. त्यामुळे नंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती या मराठ्यांना बाहेर काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे ज्या टोकाची लढाई लढायची वेळ येईल ती लढायची पण यांना सोडायचं नाही बाहेर काढायचं कारण हे बोगस आरक्षण खात आहे.
मराठ्यांच्या विरोधात जर बोगस प्रमाणपत्र त्या म्हणल्या असतील, पण मला असं वाटतं की त्या अशी भूमिका मांडणार नाहीत. कारण त्यांना मोठ्या साहेबांचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालायचा. बीड जिल्ह्यातील लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जीआरविरोधात कुणी कोर्टात गेलं. तर जीआर टिकवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे जरांगे म्हणाले.
