अंगारकी चतुर्थी: जालन्यात राजुरेश्वर गणतीला भाविकांची गर्दी, ऑनलाइन दर्शनासाठी लाईव्ह युट्युब चॅनलचा शुभारंभ!

आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने जालन्यातील राजुरेश्वराच्या मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. तसेच आजपासून राजुरेश्वराच्या दर्शनासाठी लाइव्ह युट्युब चॅनलचाही शुभारंभ होत आहे.

अंगारकी चतुर्थी: जालन्यात राजुरेश्वर गणतीला भाविकांची गर्दी, ऑनलाइन दर्शनासाठी लाईव्ह युट्युब चॅनलचा शुभारंभ!
अंगारकी चतुर्थीनिमित्त जालन्यात राजुरेश्वर गणपतीला भाविकांची गर्दी


जालनाः जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजुर येथील राजुरेश्वर (Rajureshwar) गणपती मंदिरात आज अंगारकी चतुर्थीच्या (Angaraki Chaturthi) निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील दोन वर्षांपासून हे मंदिर बंद होते. मात्र आता कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने तसेच राज्य सरकारने निर्बंध हटवल्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांतून येथे भाविक दर्शनासाठी येतात. कोरोना काळानंतर आज भाविकांनी गणपतीने मोकळेपणाने दर्शन घेतले.

आमदार कुचे यांच्या हस्ते गजाननाची आरती

Narayan Kuche, BJP

भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते राजुरेश्वराची आरती

जालन्यातील राजुरेश्वराच्या मंदिरात देशभरातून भाविक दर्शनासाठी रांगा लावत असतात. कोरोना संकट कमी झाल्याने आज भाविकांची जास्त गर्दी मंदिर परिसरात दिसून आली. आज (23 नोव्हेंबर) अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते राजुरेश्वराची सपत्नीक आरती करण्यात आली. तसेच कोरोना काळात

राजुरेश्वराचे आता लाइव्ह युट्यूब चॅनल

कोरोना संकट किंवा इतरही काही कारणांमुळे असंख्य भाविकांना इच्छा असूनही राजुरेश्वराचे दर्शन घेणे शक्य होत नाही. तसेच गर्दीमुळे गाभाऱ्यात जाऊन ‘श्री’चे मुखदर्शन घेता येत नाही. भाविकांची भक्ती लक्षात घेऊन गणपती संस्थानने राजुरेश्वराचे भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी लाइव्ह युट्युब चॅनल सुरु केले आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘गजर राजुरेश्वराचा’ या लाइव्ह चॅनलचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या लाइव्ह चॅनलचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

इतर बातम्या-

राज्य सरकारनं बहुजनांना अंधारात लोटलं, OBC आरक्षणासाठी अध्यादेश काढून संरक्षण देण्याचं ढोंग, पंकजांचा घणाघात

तुम्हाला इम्पिरिकल डेटाची व्याख्या तरी माहीत आहे काय?; पंकजा मुंडेंनी सांगितला अर्थ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI