AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: रखरखत्या उन्हात उपोषण… मनोज जरांगेंचा तो पण… आश्वासनांचे गुळपीठ नकोच… नेमक्या मागण्या काय?

Manoj Jarange Hunger Strike: काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांविषयी आश्वासक आश्वासन दिले. पण मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत. रखरखत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसतील. काय आहेत त्यांच्या मागण्या?

Manoj Jarange: रखरखत्या उन्हात उपोषण... मनोज जरांगेंचा तो पण... आश्वासनांचे गुळपीठ नकोच... नेमक्या मागण्या काय?
मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 30, 2026 | 9:31 AM
Share

Manoj Jarange Hunger Strike: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीचा कालावधी स्पष्ट होईपर्यंत आता मागे हटायचं नाही असा निर्धार पाटील यांनी केला आहे. त्यांनी नुकतेच अंतरवाली सराटीत मारूतीरायचे दर्शन घेतले आहे. आता ते उपोषणस्थळाकडे निघाले आहेत. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज सकाळी 10 वाजता उन्हामध्ये बाजीवर त्यांचे आंदोलन होणार असल्याचे समजते.

सरकारी शिष्टमंडळाची शिष्टाई नाही आली कामी

आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील भरउन्हात आमरण उपोषणास बसणार आहे. त्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद साधतील. आंदोलनाच्या ठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधतील. काल राज्याचे महसूल मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट घेतली. त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयात त्यांनी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जरांगे यांच्या काही प्रमुख मागण्यांपैकी मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटपाविषयी त्यांनी आढावा घेतला. त्याविषयीची माहिती शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना दिली. पण 58 लाख कुणबी नोंदी असताना तितके प्रमाणपत्र का निघाले नाहीत. अधिकाऱ्यांना कोणी प्रमाणपत्र वाटप न करण्याचे आदेश दिले यावरून जरांगे पाटील संतापले. सरकारने आश्वासनाचे गुळपीठ देऊ नये

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

स्वतंत्र मराठा मंत्रालय सुरू करा, त्यासाठी लेखी आश्वासन द्या

मंत्रीमंडळ उपसमिती बरखास्त करा

सातारा संस्थान गॅझेट आरक्षणाचा शासन निर्णय अगोदर काढा

मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना आज संध्याकाळपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या

वाटप कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी ग्रामपंचायतीत करा

मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या

अंतरवाली सराटीत लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंदवा

आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी द्या

राधाकृष्ण विखे पाटील भेटीला 

दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. उपोषण सुरू करण्यापूर्वी ते अंतरवाली सराटीत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  अर्धा तासांनी म्हणजे 10 वाजता जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. त्यापूर्वी विखे पाटील हे उपोषण स्थळी दाखल होतात का? की फोनवरून जरांगेंशी संवाद साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!