AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘येताना मराठा आरक्षणाचा जीआर घेऊनच या, नाहीतर…’, मनोज जरांगे यांचा सरकारला मोठा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर मोठी घोषणा करतील, असं वाटत होतं. पण त्यांनी ठोस अशी कोणतीही मोठी घोषणा केली नाही. त्यानंतर जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

'येताना मराठा आरक्षणाचा जीआर घेऊनच या, नाहीतर...', मनोज जरांगे यांचा सरकारला मोठा इशारा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 04, 2023 | 5:06 PM
Share

जालना | 4 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्याआधी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तीनही मंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली. जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी आरक्षण द्यावं अशी मागणी केलीय. याबाबत मुख्यमंत्री आज मोठी घोषणा करतील, असं वाटत होतं. पण मुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस भूमिका केली नाही. त्यानंतर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

“मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या. तुम्ही चर्चेचं दार खुलं केलं असं म्हणून पहिलेच पाढे बोलू नये. त्यामुळे सरकारने आमचं आरक्षण जाहीर केलं असेल, सरकारने शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, सरकारने शंभर टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला असेल. कारण त्याठिकाणी छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले देखील होते. सरकारचं शिष्ठमंडळ येताना मराठा आरक्षणाच्या विजयाचं पत्र घेऊन येईल”, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

‘आरक्षणाचा जीआर आला नाही तर…’

“सरकारचं शिष्ठमंडळ जीआर घेऊन येतंय. आम्ही त्याची वाट पाहतोय. पण जीआर आला नाही तर आंदोलन मागे घेणार नाही. जीआर आलं नाही तर उद्यापासून पाणी सुटलं ते समजा. सरकारच्या प्रतिनिधीची वाट बघेन. त्यानंतर मी अधिकृत भूमिका जाहीर करेन. आम्ही आता अधिकृत असं काहीच बोलू इच्छित नाही. पण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा जीआर घेऊनच सरकारचं शिष्टमंडळ येईल”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“सरकारला दोन दिवसांचा वेळ आहे. मराठा घाबरलेला नाही. प्रत्येकाच्या कनाकनात ऊर्जा आहे. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाच थांबणार. त्यांचं शिष्ठमंडळ येतंय अशी माहिती मिळाली आहे. या शिष्टमंडळाने माहिती दिल्यानंतर आमची गावकऱ्यांसोबत बैठक पार पडेल. या बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल”, अशी माहिती मनोज जरांगे यांनी यावेळी दिली.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?