Manoj Jarange: कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश कुणाचे? मनोज जरांगेंनी थेट नावच जाहीर केले, फडणवीसांना कोणता इशारा?

Manoj Jarange Press Conference: कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले आहे. त्यांनी फडणवीस सरकार आणि मंत्र्यांना शिंगावर घेतले आहे. त्यांनी

Manoj Jarange: कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश कुणाचे? मनोज जरांगेंनी थेट नावच जाहीर केले, फडणवीसांना कोणता इशारा?
कुणबी प्रमाणपत्र, मनोज जरांगे पाटील, देवेंद्र फडणवीस
| Updated on: Aug 06, 2026 | 12:12 PM

मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यामुळे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी अडचणीत आले. 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. कुणाच्या आदेशाने कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले याचे नावच त्यांनी उघड केले. कोणत्या मंत्र्यांच्या आदेशाने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले हे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

बावनकुळेंचे नाव घेत फडणवीसांवर हल्लाबोल

कालपासून राज्यात सरकार पासून एक कट शिजला गेला. फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांकडून कट शिजला जात आहे. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायचे. मी एकटा पडावा म्हणून सरकार ने जाणून बुजून कट रचला असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. पुरेपूर आणि नियोजित कट सरकारकडून रचला गेला. मी सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली.

सरकारने निवडून मराठ्यांकडून यायचं आणि नंतर मराठ्यांचा घात करायचा. आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ. ज्योती शिंदे यांचं प्रमाणपत्र तुम्ही कायमच रद्द करा, कोणी दिला आदेश? प्रचंड गैरसमज निर्माण केला गेला. राजकीय द्वेषातून रद्द केले. फडणवीस तुम्ही विनाकारण मराठे अंगावर घेतायत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रद्द करायला सांगत आहेत. यशवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हीच नोंद ग्रामपंचायत मध्ये लावली. तुमचा(म्हणजे भाजप)उमेदवार निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून रद्द करायला लावला, असा आरोप जरांगे पाटील यांनी बावनकुळे आणि फडणवीस यांच्यावर केला. जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांचे पुरावे दाखवताना संतप्त झाले. सरकारच्या एकाही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील, तितके दाखवत आहे. बावनकुळे यांनी सांगितलं की नोंदी रद्द करा. त्यांनी endoncement करून पत्र दिलं असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.

15 लाख रुपये द्या म्हणतात

15 लाख रुपये द्या म्हणतात, ऑफ द रेकॉर्ड बोलतात, असा गंभीर आरोप त्यांनी बावनकुळे यांच्यावर लावला. कुणबी प्रमाणपत्र हे केवळ 15 लाख रुपयासाठी रद्द करता का? असा सवाल त्यांनी केला. फडणवीस हे बावनकुळे यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बावनकुळे यांच्यासाठी 15-20 आमदार पाडून टाकीन असा इशारा त्यांनी फडणवीस सरकारला दिला. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. त्यांनी सरकाराला शिव्यांची लाखोली वाहिली. सरकार खोटारडेपणा करत आणि दबावापोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. तर मराठ्यांचे नेते म्हणवणारे शिंदे सेनेतील आणि भाजपातील नेते आता मराठ्यावर अन्याय होत असताना का बोलत नाही असा सवाल जरांगे यांनी केला. मी अनेकदा सांगितले की तुम्ही हा खेळ करू नका, जवळचे लोक आहेत. बावनकुळे यांच्याविषयीही चांगलेच म्हटले. पण त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की तात्पुरते नोंदी घे आणि नंतर प्रमाणपत्र रद्द केले. मी आता सरकारला बेजार करेल. यांच्या अनेक सीटा पाडेल असे मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us