AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटील भाजपला म्हणतात रुको, जरा सबर करो, उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा चुकीचा

कालपासून भाजप नेत्यांनी ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, म्हणायला सुरूवात केलीय. मात्र त्यांना आता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी इशारा दिलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक वेगळी रंगत आली आहे.

जयंत पाटील भाजपला म्हणतात रुको, जरा सबर करो, उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा चुकीचा
जयंत पाटील यांचा भाजपला इशाराImage Credit source: tv9
| Updated on: Mar 11, 2022 | 7:33 PM
Share

मुंबईकालच पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Five State Election result 2022) लागला. त्यानंतर राज्यातल्या आणि देशातल्या भाजप नेत्यांचा (Bjp) कॉन्फिडन्स वाढलाय. कालपासून भाजप नेत्यांनी ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, म्हणायला सुरूवात केलीय. मात्र त्यांना आता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी इशारा दिलाय. उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला लगावला आहे. उत्तर प्रदेशात मायावतींना मतं अधिक पडली आहेत. सर्व पक्ष उत्तरप्रदेशमध्ये एकवटले असते तर विजय झाला असता असा दावा करतानाच भाजपच्या हातातूनही अनेक राज्य गेली होती याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली. त्यामुळे निवडणुका जरी इतर पाच राज्यात पार पडल्या असल्या तरी राज्यातलं वातावरण तापलंय.

महाविकास आघाडीला धोका नाही

महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला हरकत नाही परंतु भाजपमधील लोकांवरही कारवाई व्हावी. आम्ही भाजपची यादी दिली आहे.कारवाई व्हावी असे जाहीर आव्हानही जयंत पाटील यांनी दिले. देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे त्याचा विरोध करायला हवा त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

कोण आक्रमक होणार?

जंगजंग पछाडूनही महाविकास आघाडी पडत नाही हे भाजपच्या लक्षात आले आहे असा जोरकस टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. गोव्यात आमचे फारसे नेतृत्व नव्हते.आम्ही काँग्रेस सोबत येईल याची वाट पाहत होतो असेही जयंत पाटील यांनी गोव्यातील पराभवावर भाष्य केले. यंत्रणांवर दबाव आणण्याचे कारण नाही पण 6 वाजता समन्स न देता नवाब मलिक यांना घेऊन गेले याची आठवण करून देतानाच आता केंद्रीय यंत्रणा आक्रमक होतील की पक्ष हे पाहावे लागेल असा स्पष्ट इशाराही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.  गेल्या काही दिवसात केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातल्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई सुरू आहेत. त्यावरून पुन्हा राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा जोरदार संघर्ष सुरू आहे.

5 पैकी 4 राज्यात मोदींची हवा! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विजयी रॅली गुजरातमध्ये

Maharashtra Budget 2022 : पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प-आशिष शेलार

UP Election | लखीमपूर, हाथरस, उन्नाव, जिथल्या घटनांमुळे देशभर भाजपची नाचक्की झाली तिथं कोण जिंकलं?

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.