Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम करे तो रासलिला अन् हम…’ आव्हाडांनी राऊतांना सुनावलं, पवारांवरील टीकेला चोख प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती, या टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'तुम करे तो रासलिला अन् हम...' आव्हाडांनी राऊतांना सुनावलं, पवारांवरील टीकेला चोख प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Feb 12, 2025 | 11:02 PM

मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, मात्र यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आम्ही शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला, मात्र आता आमच्या विश्वासाचा घात झाला असं वाटतं असं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांच्यासोबतच विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांनी देखील शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हटलं जितेंद्र आव्हाड यांनी?   

‘तुम करे तो रासलिला… हम करे तो कॅरेक्टर ढिला ? तुम करे तो चमत्कार… हम करे तो बलात्कार ? दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही.’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज शरद पवार यांच्यावर टिका केली होती.  काल नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांनी सत्कार केला होता आणि त्यांचे कौतुकही केले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून तिव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टिका केल्यानंतर त्याला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विनायक राऊत यांचीही टीका 

दरम्यान दुसरीकडे याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी देखील शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे, ‘शरद पवार साहेबांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केला आहे, म्हणून राऊत साहेब जे बोलले ते बरोबर बोलले. शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता, पण विश्वासघात झाला, असं राऊत साहेबांनी म्हटलं आहे’ असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.