
महापालिका निवडणुकांच्या रणधुाळीत अख्खं राज्य गुंतलेलं असतानाच संपूर्ण महाराष्ट्र ज्याची उत्सुकतेने वाट पहात होता त्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे मिळून आगामाी महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार असून ‘मुंबई वाचवा’चा जोरदार नारा ठाकरे बंधूंनी दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तर अतिशय प्रतिष्ठेची बनली असून मुंबईतचा महापौर कोण होणार, मराठी माणूस की अजूनकोणी याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आजपासून बरोब्बर 8 दिवसांनी, 15 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पार पडणार आहे, तर शुक्रवार 16 जानेवारीला मजमोजणी होऊन निकाल लागेल. त्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी प्रचार सभा, फेऱ्या, मुलाखती, यांचा सपाटा सुरू असून 20 वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत देखील नुकतीच घेण्यात आली.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज व उद्धव या दोघांची संयुक्त मुलाखत घेत विविध विषयांवर त्यांची मतं जाणून घेतली. या मुलाखतीचा टीझर रिलीज झाल्यावर मोठा प्रतिसाद मिळाला होता आता त्याच मुलाखातची पहिला भाग समोर आला असून राज व उद्धव यांनी मुंबई, त्याबद्दलचं व्हिजन, भाजपा, महायुती सरकार, भ्रष्टाचार, मुंबईतील परप्रांतीयांचे लोंढे अशा विविध मुद्यांवर मनमोकळेपणे मत मांडली. संजय राऊत व मांजरेकरांनी विचारलेल्या काही प्रश्नांची सडेतोड उत्तरही या दोघांनी दिली.
मुंबईचं ‘डेथ वॉरंट’ निघालं आहे…
यावेळी मुंबईच्या मुद्यावर बोलताना संजय राऊत यांनी विविध प्नश्न विचारले. महाराष्ट्रात मराठी माणसाचं डेथ वॉरंट निघतंय, असं राऊतांनी म्हणतात, त्यावर राज आणि उद्धव या दोघांनी दुजोरा दिला. ही माणसं जी आहेत ना, ती बसलेली नाहीत, बसवलेली माणसं आहेत. त्यामुळे ते फक्त जागा पाहतात. त्यांच्याकडे सहीसाठी फायली येतात आणि त्यांना सही करायला सांगितली जाते. आपण काय करतोय, काय घोडचुका केल्या आहेत ते इउथल्या लोकांना, मराठी माणसांना अजून समजत नाहीये, पण आणखी काही काळीाने त्यांना समजेल की काय चूक झाली आहे, ते असं राज ठाकरे म्हणालेय
मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातंय! असं म्हणत राज ठाकरेंनी राऊतांच्या म्हणण्याला सहमती दर्शवली. आपण मुंबईतले आहोत, इथे जन्म घेतला वाढलो, आपण सगळे मुंबईकर आहोत. पण इथे बाकीचे सगळे आहेत ना, अगदी देवेंद्र फडणीवस हे देखील, ते बाहेरचे आहेत. फडणवीस तर नागपूरचे आहेत. ठाकरे यांनी ‘मूळ मुंबईकर’ ही संकल्पना मांडत फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
इथे जन्माला आल्याशिवाय मुंबईचे प्रश्न समजणार नाही
देवेंद्र फडणवीस नागपूरचे. बाकीचेही सगळे बाहेरचे असं म्हणत राज ठाकरे यांनी उदाहरण दिलं. ते म्हणाले, मी एकदा स्वीत्झर्लंडला गेलो होतो. तिथे मी तो देश पाहिला. गाड्या इकडे तिकडे फिरत होत्या, सर्व चांगलं होतं, सर्वांना चांगल्या नोकऱ्या, रस्तेही मस्त. निसर्गही छान तिकडचा. अगदी सगळं छान. ते पाहून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की इथे जेव्हा निवडणुका येत असतील तेव्हा इथला विरोध पक्ष काय करत असेल? मी तुम्हाल हे देईन, ते देऊन, असं ते काय सांगत असतील ? असा सवाल राज यांनी विचारला. मुंबईत मुंबईकरांना काय पाहिजे, हे मला असं वाटतं की तुम्हाला तिथं जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. जेव्हा तुम्ही बाहेरून येऊन एखादा देश, जागा बघता, तेव्हा तिथले प्रश्न का. आहेत, समस्या कोणत्या हे तुम्हाला समजणारच नाही असं राज यांनी सुनावलं.
एखादा गृहनिर्माण मंत्री किंवा पीडब्ल्यूडी मिनिस्टर मुंबईत आले, तर त्यांना प्रश्न पडेल की या शहराचा काय प्रॉब्लेम असेल ? रस्ते, हॉस्पिटल, दिवे, शळा, कॉलेजस सगळं आहे. पाणीही 24 तास आहे इथे, मग इथे काय प्रॉब्लेम असणार ? असं त्यांना वाटेल. त्यांच्याकडे रस्ते. लोडशेडिंग या सर्वाँशी तुलना करतात ते, मग इथे त्यांना काहीच कमी वाटणार नाही, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात असं म्हणत तुमची मानसिकता कशी आहे त्यावर सगळं अवलंबून आहे असं राज ठाकरेंनी नमूद केलं.