AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न सुप्रिया सुळेंच्या कन्येचं, चर्चा मात्र या काश्मिरी… कोण आहेत कायनात धार?

Who is Kainat Dhar : रेवती सुळे यांच्या लग्नात कायनात धार यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. कायनात धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासह प्रवेश केला. कायनात धार कोण आहेत ते जाणून घेऊयात.

लग्न सुप्रिया सुळेंच्या कन्येचं, चर्चा मात्र या काश्मिरी... कोण आहेत कायनात धार?
Who is Kainat DharImage Credit source: Google
| Updated on: Jun 20, 2026 | 10:34 PM
Share

खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह आज सारंग लखानी यांच्याशी मुंबईत पार पडला. या विवाहसोहळ्याला राज्यासह देशातील अनेक मान्यवर नेते हजर होते. पवार कुटुंबातील सर्वच सदस्य या सोहळ्याला हजरे होते. पार्थ पवार, जय पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवार आणि राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या विवाहसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत. यात कायनात धार यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कायनात धार यांच्या नावाची चर्चा…

रेवती सुळे यांच्या लग्नात कायनात धार यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. कायनात धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासह प्रवेश केला. याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे कायनात धार कोण आहेत? अशी चर्चा सुरू झाली आहे. याआधीही त्यांचे नाव चर्चेत आले होते. आज आपण कायनात धार कोण आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोण आहेत कायनात धार?

समोर आलेल्या माहितीनुसार कायनात धार या काश्मीरमधील रहिवासी आहेत. मात्र राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांच्यासोबत त्या अनेक सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. काही दिवसांपासून कायनात धार यांनी पार्थ पवार यांच्यासोबत मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात दर्शन घेतले होते. पवार कुटुंबासोबत त्यांचे जवळते संबंध आहेत. कारण त्या विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी हजर असतात. मात्र, कायनात धार आणि पवार कुटुंब यांच्यातील नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अनेक राजकारण्यांची हजेरी

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, राज ठाकरे, भगवंत मान, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राहुल गांधी, वर्षा गायकवाड, डीएमकेच्या खासदार कनिमोझी, रोहित पवार, ओमर अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला, शायना एनसी, खासदार डी राजा, दिग्विजय सिंग, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, निशिकांत दुबे, जय पवार, धीरज देशमुख, बासुरी स्वराज, अमोल कोल्हे, पूर्वा वळसे पाटील, अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग