AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जत जामखेडची निवडणूक शेवटपर्यंत ठरली रंजक, पाहा कोणी मिळवला विजय?

Karjat jamkhed assembly election : कर्जत जामखेडमध्ये शेवटपर्यंत कांटे की टक्कर पाहायला मिळाली. रोहित पवार आणि राम शिंदे हे आघाडी आणि पिछाडीवर सुरु होते. पण अखेर शेवटी निकाल लागला आहे. शेवटच्या फेरीत ईव्हीएम मशीन खराब झाल्याने अखेर व्हीव्हीएपॅटची मोजणी करुन निकाल देण्यात आला.

कर्जत जामखेडची निवडणूक शेवटपर्यंत ठरली रंजक, पाहा कोणी मिळवला विजय?
| Updated on: Nov 23, 2024 | 8:17 PM
Share

महाराष्ट्रातील कर्जत जामखेड मतदारसंघावरील निवडणूक शेवटपर्यंत रंजक राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित राजेंद्र पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. पण अखेरच्या ईव्हीएममध्ये रोहित पवार यांची लीड वाढली आणि त्याना विजयी घोषित करण्यात आलं. रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला. त्यांना एकूण 1,27,676  मते मिळाली, तर राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली. या जागेसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. NOTA ला 601 मते पडली. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार पहिल्यांदा विजयी झाले होते. त्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार आणि कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता.

भाजपचा बालेकिल्ला

2019 च्या निवडणुकीपूर्वी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपला बालेकिल्ला होता. सलग 5 वेळा येथून भाजपने विजय मिळवला होता. 2019 च्या निवडणुकीत मात्र भाजपचा बालेकिल्ला ढासळला. 1995, 2000 आणि 2005 असे सलग तीन वेळा भाजपचे सदाशिव लोखंडे या जागेवरून विजयी झाले. तर 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे येथून विजयी झाले होते.

रोहित पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू दिनकरराव गोविंदराव पवार यांचे नातू आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव राजेंद्र पवार आणि आईचे नाव सुनंदा पवार आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार राम शिंदे हे सध्याचे विधान परिषद सदस्य आहेत. 2019 पूर्वी ते महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंधारण मंत्री होते. 2009 आणि 2014 मध्ये ते सलग दोन वेळा या जागेवरून आमदार राहिले आहेत. त्याचबरोबर या वेळी भाजपला या जागेवर पुनरागमन करण्याची आशा होती. पण रोहित पवार यांनी येथे खूपच कमी फरकाने विजय मिळवला आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष

महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप सध्या 133 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुतीला 231 जागा मिळाल्या आहेत. अनेक जागांचे निकाल जाहीर झाले असून काही जागांचे निकाल येणे अजून बाकी आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीला फक्त 45 जागा मिळाल्या आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.