AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खोक्या भाऊ माझ्यासाठी चांगलाच’, …अन् करुणा शर्मांनी सांगितला सतीश भोसलेचा तो किस्सा

खोक्या भोसले प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी मोठा दावा केला आहे, त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा यावेळी सांगितला.

'खोक्या भाऊ माझ्यासाठी चांगलाच', ...अन् करुणा शर्मांनी सांगितला सतीश भोसलेचा तो किस्सा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2025 | 3:06 PM
Share

खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली. त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. एवढंच नाही तर खोक्या हा व्यक्ती माझ्यासाठी चांगला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा?  

मी खोक्या भाऊला ओळखत नाही, मला एका बँकेच्या ओपनिंगसाठी बोलावण्यात आलं होतं. तेव्हा मी पहिल्यांदा बीडमध्ये आले होते.  माझा फोटो त्याच्यासोबत हे लोक व्हायरल करत आहेत, काही प्रॉब्लेम नाही करा. पण तो व्यक्ती माझ्यासाठी चांगला आहे, कारण मी जेव्हा बीडला गेले होते तेव्हा तीथे मला काही गुंडांनी अडवलं होतं. तुम्हाला गहिणीनाथ गडावर जाता येणार नाही असं त्यांनी मला म्हटलं.

तेव्हा तिथे खोक्या आला अन् मला सांगितलं की तुम्हाला जर जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्यासोबत येतो. तेव्हा मी त्याला म्हटलं जर वातावरण खराब होत असेल तर मला तिकडे जायचं नाही. एवढंच आमचं बोलंण झालं. माझी त्याच्याशी काही ओळख नाही. तुम्ही माझे सीडीआरपण चेक करू शकता, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वनविभागाकडून खोक्याचं घर पाडण्यात आलं, त्यानंतर अज्ञात व्यक्तिंनी रात्रीच्या सुमारास खोक्याच्या घराला आग लावली, यावर देखील करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचही घर पाडायला जाळायला नको, एखाद्या व्यक्तीचं घर जाळण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्हाला जर घर पाडायचं, जाळायचं असेल तर त्यांचे जाळा जे मुलांना गुंड प्रवृत्तीकडे नेत आहेत. वाल्मिक कराडचं घर का नाही तोडलं? असा सवाल यावेळी करुणा शर्मा यांनी केला आहे. बीडची परिस्थिती बिकट आहे,  पण आता एसपी साहेबांनी ती आटोक्यात आणली पाहिजे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.