AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!

Khavdya Dongar New Video : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून खाली पडल्याने चांदगुडे कुटुंबाचा अंत झाला आहे. अशातच आता या घटनेपूर्वीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.

Video : खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्... चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!
khavdya dongar new videoImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 22, 2026 | 5:24 PM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेनंतर आता या घटनेशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्याची आई त्याला समजावत असल्याचे दिसून येत आहे. आईकडून मुलाला खाली येण्याची विनंती केली जात असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.

खवड्या डोंगरावरील नवा व्हिडिओ समोर

समोर आलेल्या व्हिडिओत कुटुंबीय, नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवान कुणालला समजावण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. अनेकजण त्याला जीव देऊ नकोस, हे जीवन पुन्हा नाही असं समजावताना दिसत आहेत. मात्र तरीही कुणाला कुणाचेही ऐकत नसल्याचे दिसत आहे. त्याची आई हात जोडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच इतर लोकही त्याला समजावताना दिसत आहेत.

तिघांचा दुर्दैवी अंत

या व्हिडिओनंतर काही वेळातच परिस्थिती अत्यंत दुर्दैवी वळणावर गेली आणि मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाला. त्यानंतर पती आणि मुलाला डोळ्यांसमोर गमावल्याने आईचाही दुर्दैवी अंत झाला. आता समोर आलेल्या या व्हिडिओमुळे त्या क्षणाचा थरार पुन्हा एकदा समोर आला असून, आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अखेरपर्यंत करत असलेले प्रयत्न या दृश्यातून दिसून येत आहेत. या दुर्दैवी घटनेत, कुणाल चांदगुडे, मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे यांचा मृत्यू झाला आहे.

चांदगुडे कुटुंबाबाबत धक्कादायक माहिती समोर

अशातच आता कुणालच्या मोठ्या भावाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या मोठ्या भावाचं आजारपणामुळे आकाली निधन झालं होतं, त्यानंतर आता कुणाल याने देखील आपल्या आयुष्याचा शेवट केला. कुणाल याचे वडील ट्रक चालवायचे, ते अनेकदा कामानिमित्त बाहेरच असायचे, मात्र घरात मुलगा आणि वडिलांचं पटत नव्हतं, त्यांच्यामध्ये सातत्याने खटके उडायचे अशी माहिती देखील आता समोर येत आहे. काल देखील असाच वाद झाला असावा, आणि रागाच्या भरात कुणालने टोकाचं पाऊल उचललं असावं अशी देखील चर्चा सुरू आहे.

Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र