AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, किसान सभेचा इशारा

केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी असे बेजबाबदार वर्तन थांबवावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा किसान सभेने दिला आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, किसान सभेचा इशारा
FARMER AND RAIN
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 10:49 PM
Share

मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात अतिवृष्टी झाल्याने 12 लाख हेक्‍टरवरील खरिप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. मराठवाडा व विदर्भातील ओढे, नदी-नाल्यांना पूर आल्याने काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. राज्य व केंद्र सरकारमध्ये सामील पक्षांचे नेते अशा भीषण आपत्तीचेही राजकारण करू पाहत आहेत. मदतीची जबाबदारी एक दुसऱ्यावर ढकलू पहात आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी असे बेजबाबदार वर्तन थांबवावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा किसान सभेने दिला आहे.

किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेऊन वाटचालीची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिक येथे संघटनेच्या राज्यभरातील प्रमुख 250 कार्यकर्त्यांची दोन दिवसांची कार्यशाळा दिनांक 1 व 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांचे प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित आहेत. राज्यभरातील प्रतिनिधींकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत किसान सभेने हा इशारा दिला आहे.

जगप्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते उद्घाटन

किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनाला जोरदार चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उदघाटन जगप्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. शेतकऱ्यांच्या विविध समस्या व त्यावरील उपायांवर यावेळी पी. साईनाथ यांनी सविस्तर मांडणी केली. 2 ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. आर. रामकुमार आणि किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष जे. पी. गावीत, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, सहसचिव सुनील मालुसरे व इतर पदाधिकारी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत

राज्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सखोल आढावा कार्यशाळेत घेण्यात आला. केंद्र व राज्य सरकारने मिळून तातडीची प्राथमिक मदत म्हणून प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत. त्यानंतर पीक व शेतजमीन नुकसानीचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांचे उर्वरित संपूर्ण नुकसान भरून निघेल अशी ठोस मदत करावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

फलाईन सूचना स्वीकारण्याची संपूर्ण व्यवस्था करावी

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत आपत्तीची सूचना देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतावर व पिकांवर ओढवलेल्या आपत्तीची सूचना देता यावी यासाठी कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करावे. पीक विमा कंपन्यांनी आपली कार्यालये व हेल्पलाइन 24 तास सुरू राहतील अशी व्यवस्था करावी. रेंज अभावी शेतकऱ्यांना आपत्तीची ऑनलाईन सूचना देण्यात अडथळे येत असल्याने ऑफलाईन सूचना स्वीकारण्याची संपूर्ण व्यवस्था महसूल विभाग, कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांनी करावी अशी मागणी किसान सभेने केली आहे. सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही, तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारादेखील किसान सभेने दिलाय.

इतर बातम्या :

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?

मास्तराच्या मुलाची संपत्ती हजार बाराशे कोटींची कशी?, त्यांची चौकशी का होत नाही?; नाथाभाऊंचा सवाल

Mumbai School Reopen : आठवड्यात तीन दिवस निर्जंतुकीकरण, पालकांच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश : किशोरी पेडणेकर

(kisan sabha demand help to heavy rain affected farmers unless will protest against state government)

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश