Kokan Railway: चाकरमान्यांचा प्रवास होणार वेगवान, कोकण रेल्वे आता विजेवर धावणार सुसाट

प्रदूषणातूनही सुटका होणार असून डिझेलपोटीच्या खर्चामुळे वार्षिक दीडशे कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. त्याचा खरा फायदा हा कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे.

Kokan Railway: चाकरमान्यांचा प्रवास होणार वेगवान, कोकण रेल्वे आता विजेवर धावणार सुसाट
कोकण रेल्वेचे प्रातिनिधिक चित्र
Image Credit source: Twitter
महादेव कांबळे

|

Apr 22, 2022 | 9:53 AM

रत्नागिरीः कोकण रेल्वेचे (Kokan Railway) नुकतेच रोहा ते ठोकूर असे विद्युतीकरण (Electrification) पूर्ण झाले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कोकण मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या डिझेलऐवजी विजेवरील इंजिनांच्या सहाय्याने धावणार आहेत असे रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) सांगण्यात आले आहे. 1 मेपासून पहिल्या टप्प्यात दहा गाड्यांना विजेवरील इंजिनाच्या सहाय्याने चालविले जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ होणार आहे. तसेच प्रदूषणातूनही सुटका होणार असून डिझेलपोटीच्या खर्चामुळे वार्षिक दीडशे कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. त्याचा खरा फायदा हा कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे.

‘या’ एक्प्रेस विजेवर धावणार

मंगळुरू सेंटर-मडगाव पॅसेंजर स्पेशल, थिरूवनंतपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्प्रेस, मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्प्रेस, मंगला एक्प्रेस, नेत्रावती एक्प्रेस, मत्स्यगंधा एक्प्रेस, सीएसएमटी-मंगळुरू जंक्शन एक्प्रेस, कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी अशा दहा एक्प्रेस अप आणि डाऊन दिशेला विजेच्या इंजिनाच्या सहाय्याने चालविण्यात येणार आहेत.

डिझेलचा खर्च वाचणार

कोकण रेल्वेचे नुकतेच रोहा ते ठोकूर असे विद्युतीकरण पूर्ण झाले असल्याने आता रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार असून प्रदूषणावरही मात करता येणार आहे. त्याच बरोबर डिझेलवर होणारा खर्चही टाळता येणार आहे. त्यामुळे रेल्वेची वार्षिक बचत ही दीडशे कोटींची होणार आहे. रेल्वे गाड्यांचा वेग वाढल्यामुळे त्याचा फायदा प्रवाशांना होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

चाकरमान्याचा प्रवास झाला सुखकर

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याना कोकण रेल्वेचा मोठा आधार आहे. त्यामुळे आता ही रेल्वे लाईन विद्युतीकरण झाले तर त्याचा फायदा चाकरमान्यांसह गोव्यात जाणाऱ्या रेल्वेप्रवाशांना होणार आहे.

संबंधित बातम्या

Video Sanjay Raut | नागपुरात पुढचा महापौर शिवसेनेचा असेल, संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांमध्ये फुंकले प्राण

जय भीम सिनेमा आठवतोय? अटकेतील आरोपीचा मारहाणीत मृत्यू! सोलापुरातील पोलिसांविरोधात गुन्हा

Nashik: बाप रे, एकट्या नाशिकमधून 3 महिन्यांत 81 मुलांचे अपहरण; निम्म्यांचा अजूनही शोध नाही

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें