मुंबईत 'कॅन्सर' उपचारानंतर कोल्हापूरला परतलेल्या बालिकेला कोरोना, वडिलांनाही लागण

राधानगरी तालुक्यातील 11 वर्षांची कॅन्सरग्रस्त बालिका आणि तिच्या 35 वर्षांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. (Kolhapur Cancer Patient Girl returned from Mumbai is Corona Positive)

मुंबईत 'कॅन्सर' उपचारानंतर कोल्हापूरला परतलेल्या बालिकेला कोरोना, वडिलांनाही लागण

कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात ‘कोरोना’ने शिरकाव केला आहे. कर्करोगाच्या उपचारानंतर मुंबईहून परतलेली 11 वर्षांची लहानगी आणि तिचे वडील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आहेत. (Kolhapur Cancer Patient Girl returned from Mumbai is Corona Positive)

कोल्हापुरात काल रात्री (गुरुवार 14 मे) 11 वाजता दोघा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे.

राधानगरी तालुक्यातील 11 वर्षांची कॅन्सरग्रस्त बालिका आणि तिच्या 35 वर्षांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी वडील, मुलगी आणि इतर दोन नातेवाईक असे चौघे जण मुंबईला गेले होते.

मुंबईहून कोल्हापूरला परत आल्यानंतर चाचणी केली असता बापलेकीचे अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आले. राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हारवडे गावातील हे रहिवासी असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : पुण्यात ‘कोरोना’ संशयिताची आत्महत्या, रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी

एकाच दिवशी काल कोल्हापुरात चार कोरोना रुग्णांची वाढ झाली. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 10 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर एकाला ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत.

कोल्हापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव

मुंबई, सावंतवाडी असा प्रवास करुन आलेल्या आकुर्डीतील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं एप्रिलअखेरीस समोर आलं होतं. लॉकडाऊनच्या काळात कंटेनरमध्ये लपून मुंबईहून कोल्हापूरला आलेल्या एका कामगाराला 19 एप्रिल रोजी ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. याच कंटेनरमधून प्रवास केलेल्या 42 वर्षीय महिलेचे रिपोर्टही पॉझिटिव्ह (20 एप्रिल) आले होते. त्यावेळी कोल्हापुरात पहिल्यांदाच सलग दोन दिवस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. (Kolhapur Cancer Patient Girl returned from Mumbai is Corona Positive)

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती काय?

– महाराष्ट्रात कोरोनाबळींनी ओलांडला एक हजाराचा टप्पा
– राज्यात काल 44 बळी, एकूण बळी 1019 वर
– काल 1602 नवे रुग्ण, सलग नवव्या दिवशी हजारहून अधिक रुग्ण
– महाराष्ट्रात कोरोनाचे आता 27 हजार 524 रुग्ण
– 20 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरु

(Kolhapur Cancer Patient Girl returned from Mumbai is Corona Positive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *