AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना धक्का, आता शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’, पूर्ण कोकण १००% खाली होणार, बड्या नेत्याचे भाकीत

शिवसेना उबाठा आता कोकणात नावालाही राहणार नाही. पूर्ण कोकण १००% खाली होणार आहे. ऑपरेशन टायगर आता मार्गी लागलेला आहे. अनेक जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेत लोक येत आहे. नांदेडमध्ये बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतला.

उद्धव ठाकरेंना धक्का, आता शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर', पूर्ण कोकण १००%  खाली होणार, बड्या नेत्याचे भाकीत
उद्धव ठाकरे यांना बसणार हादरा ?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 09, 2025 | 4:19 PM
Share

महाराष्ट्रात शिवसेनेत बंड निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहे. आता उद्धव ठाकरे यांचा गड असलेल्या कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी आमदार करणार शिवसेनेत प्रवेश करणार आहे. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम करणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच राजन साळवी 13 फेब्रुवारीला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची निश्चित झाले आहे. या घटनांना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी ‘ऑपरेशन टायगर’ म्हटले आहे. कोकण शंभर टक्के रिकामे होणार आहे. शिवसेना उबाठाचे कोणीच त्या ठिकाणी राहणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, शिंदे साहेबांना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकऱ्यांची सेवा करण्याचे मान मिळालेला आहे. संजय राऊत यांनी म्हटले होते की, अमित शाह एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन करतील, टायगर ऑपरेशन काही नाही त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, त्यांचे ऑपरेशन कसे होईल, हे त्यांनासुद्धा माहीत नाही.

आमचे शिवसैनिक आमच्याकडे

कोकणातून अनेक शिवसैनिक, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आहे. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेना उबाठा आता कोकणात नावालाही राहणार नाही. पूर्ण कोकण १००% खाली होणार आहे. ऑपरेशन टायगर आता मार्गी लागलेला आहे. अनेक जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेत लोक येत आहे. नांदेडमध्ये बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतला. शिवसेना कोणाची हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आमचे शिवसैनिक आमच्याकडे आहे. सगळीकडे महाराष्ट्र मध्ये हे चित्र असणार आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

राजन साळवी प्रवेशावर उदय सामंत म्हणतात…

दरम्यान राजन साळवी यांच्या प्रवेशावरुन उदय सामंत नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, राजन साळवी यांच्या प्रवेशाबाबत आमचे नेते एकनाथ शिंदे सोबत माझी चर्चा झालेली नाही. आम्ही त्यावर सविस्तर चर्चा करू. ते पक्षात येत असतील तर त्यांच्या काय इच्छा आहेत? काय आकांक्षा आहे? त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातून त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहे. त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे.

Follow Us
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज