AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin : वेड्या बहि‍णीची वेडी माया, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी लाडक्या बहिणीने मंगळसूत्र मोडत दिले महागडे ‘गिफ्ट’

Ladki Bahin Mangalsutra Rakhi : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर एकच झुंबड उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळसूत्र मोडत एक अनोखे गिफ्ट दिले आहे.

Ladki Bahin : वेड्या बहि‍णीची वेडी माया, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी लाडक्या बहिणीने मंगळसूत्र मोडत दिले महागडे 'गिफ्ट'
लाडक्या बहिणीने दिले महागडे गिफ्ट
| Edited By: | Updated on: Aug 16, 2024 | 3:39 PM
Share

राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. हे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर एकच झुंबड उडाली आहे. तर काही ठिकाणी महिला भावूक पण झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळसूत्र मोडत एक अनोखे गिफ्ट दिले आहे. ही महागडी भेट पाहून मुख्यमंत्र्यांना सूखद धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय दिले लाडक्या बहिणीने गिफ्ट?

मंगळसूत्र राखीचे गिफ्ट

महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीतल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांना थेट आपल्या मंगळसूत्राची राखी बनवुन भेट केली आहे.स्टेला दास सकटे या महिलेने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली राखी

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात हे अर्धे तोळे सोन्याच्या दागिन्याची राखी सुपूर्द केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत आणि ही योजना अशाच पद्धतीने सुरू राहावी,अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही अनोखी भेट दिल्याचं स्टेला सकटे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांक़डून अजून मोठी अपेक्षा नाही. पण त्यांनी ही योजना आणि इतर योजना सुरु ठेवाव्यात अशी विनंती त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यांमध्ये चालू केली आहे त्याचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील काही महिलांना 15 ऑगस्ट रोजी मिळाला आहे त्यामुळे सांगलीच्या स्टेला सकटे या महिलेने आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पैसे मिळाल्याने आपले मंगळसूत्र मोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे आभार मानण्यासाठी राखी पाठवली आहे. सदर राखी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांनी पाठवली.

मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल राज्यातील महिलांनी आज सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर एकत्र जमून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या. यावेळी महिलांनी लाडक्या भावाला ओवाळून त्यांनी दिलेल्या या आर्थिक मदतीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. हातात पूजेचे ताट आणि राखी व मिठाई घेऊन महिलांनी गर्दी केली होती.

राज्यातील विविध भागात एकच गर्दी

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात वर्ग होणे सुरू झाल्याने पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी बँकेत एकच गर्दी केली आहे.  नागपूरात महिलांनी बँकांसमोर एकच गर्दी केली आहे. परभणीत लाभार्थ्यांची गर्दी पाहून वाहतूक पोलिसांना पाचारण करण्यात आले. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिलांनी बँकेत प्रचंड गर्दी केली आहे.

तर धुळ्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल येथील सेंट्रल बँक मध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर महिलांनी सेंट्रल बँकच्या एकच गर्दी केली. आधार लिंक नसल्याने आधार लिंक करण्यासाठी आणि खात्यावर पैसे जमा झाले का हे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अचानक मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाल्याने सेंट्रल बँक कर्मचाऱ्यांचे हाल झाले.

छत्रपती संभाजीनगरमधील बजरंग चौकातील एसबीआय बँकेसमोर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले. शेकडो महिलांची पैसे काढण्यासाठी रांग लावल्याचे दिसून आले. हिंगोलीत महिलांची गर्दी सावरण्यासाठी बँकेत पोलीस दाखल मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसंदर्भात केवायसी करण्यासाठी एसबीआय बँकेत महिलांची मोठी गर्दी झाली होती. रांग न मोडण्याचं आणि शिस्त पाळण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले.

कवितेचे केले वाचन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरात असलेल्या काही महिलांच्या बँक खात्यावरती पैसे आले आहेत. त्यांना या संदर्भातील मोबाईलवर नोटिफिकेशन देखील प्राप्त झालं आहेत. यावेळी या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोनही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून आलेले पैसे घर खर्च साठी वापरू तसेच मुख्यमंत्र्यांना आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना राख्या पाठवू असे देखील भावना या महिलांनी व्यक्त केली आहे. तर एका महिलेला भाऊ नसल्याने या महिलेने मुख्यमंत्र्यांसाठी एक कविताही वाचली.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.