महिलांच्या प्रवासासाठी लातूर महानगरपालिकेची “स्मार्ट” आयडिया, प्रत्येक पालिकेत हा लातूर पॅटर्न हवा

महिलांच्या प्रवासासाठी लातूर महानगरपालिकेची स्मार्ट आयडिया, प्रत्येक पालिकेत हा लातूर पॅटर्न हवा
लातूरमध्ये महिलांसाठी मोफत बससेवा
Image Credit source: tv9

लातूर महानगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी मोफत बस ही योजना अत्यंत योग्य काळात सुरु होत आहे. कोविडच्या एका पाठोपाठ एक तीन लाटा आल्या त्यामुळे पूर्ण क्षमतेनी कोणतीच गोष्ट करता आली नाही. आता मात्र सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. त्यामुळे या बसचा महिलांना चांगला फायदा होईल.

दादासाहेब कारंडे

|

Mar 18, 2022 | 10:11 PM

लातूर : लातूर महानगरपालिका (Latur municipal corporation) महिलांसाठी मोफत बस सुविधा (Free bus for ladies) पुरविणारी देशातली पाहिली महानगरपालिका ठरली आहे. महिलांना अत्यंत सुरक्षित सेवा देणारी ही योजना अत्यंत यशस्वी होईल असे मत पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी व्यक्त केले. लातूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीने ह्या सेवेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या हस्ते झाला. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लातूर महानगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी मोफत बस ही योजना अत्यंत योग्य काळात सुरु होत आहे. कोविडच्या एका पाठोपाठ एक तीन लाटा आल्या त्यामुळे पूर्ण क्षमतेनी कोणतीच गोष्ट करता आली नाही. आता मात्र सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. त्यामुळे या बसचा महिलांना चांगला फायदा होईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

कशी असेल बससेवा?

या बससाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येईल, तसेच या बस मध्ये एक कर्मचारी महिला असेल तसेच या बससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरीफिकेशन होईल. घरात आई आहे, वडील कामावर गेले, क्लास सोडायला कोणी नाही असे आता मुलीला वाटणार नाही. ती या बस मध्ये अत्यंत सुरक्षित प्रवास करेल, तिचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. हे शैक्षणिक नगरी आहे, इथे सुरक्षितता आहे म्हणून हजारो विद्यार्थी इथे शिकायला येतात या नावलौकिकात या बसचा आता समावेश होईल असे प्रतिपादन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

पर्यावरण पूरक बस

या बसेस मध्ये एक बस सी एन जी वर, एक बस इथेनॉल वर आणि एक बस इलेक्ट्रिकल असावी असा प्रयत्न महानगरपालिकेकडून करावा जेणे करून ह्या बस पूर्णपणे पर्यावरण पूरक होतील. वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी असे प्रयोग करावे लागतील.शहरातील सर्व ऑटो सीएनजी वर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता साखर कारखान्यातील ट्रॅक्टरही सीएनजी वर चालवणार आहोत. खासगी बससाठी खासगी तत्वावर टर्मिनल उभं करणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी काही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

असाही लातूर पॅटर्न

ज्या वेळी सीईटी चा निकाल लागतो त्यावेळी पहिल्या हजार दीड हजारात लातूरचे मुलं / मुली असतात. आता लातूर शहरातील क्लाससाठी स्वतंत्र हब उभं करण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी सर्व सोयीनीयुक्त असं हे हब असेल. जेणे करून लातूर देशातले शैक्षणिक केंद्र बनेल. राजस्थान मधील कोटा पेक्षा लातूर मध्ये अधिक शैक्षणिक गुणवत्तेची क्षमता आहे.त्यासाठी आपण प्रयत्न करु या, लातूर मधल्या सर्व शैक्षणिक संस्थाच्या मागे प्रबळ पणे उभं राहून हा विकास साधण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी केले.

लातूर महानगरातील नागरिकांसाठी हेल्थ कार्ड

लातूर महानगरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण व्हायात यासाठी प्रॉपर्टी टॅक्सला जोडून हेल्थ कार्ड सुरु करण्याचाही मनोदय पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी बोलून दाखविला. या वेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरासाठीच्या योजनांचा आढावा घेतला. महिलांसाठी मोफत बस सेवा बाबत महापालिका आयुक्त अमन मितल यांनी माहिती दिली. माजी महापौर स्मिता खानापूरकर ,नगर सेवक रवीशंकर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Kolhapur : भाजपचं ठरलं, सत्यजीत कदम यांना कोल्हापूर उत्तरची उमेदवारी, BJP खातं उघडणार?

BJP नेत्यांचे बिंग फोडणारी CD मलिकांकडे म्हणून अटक! जुन्या भाषणाच्या Videoने खळबळ

Gopichand Padalkar : शरद पवार पावसात भिजूनही NCP चे 54 आमदार, गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें