डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीला लिंगायत समाजाचाच विरोध

सोलापूर : लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याविरोधात आता लिंगायत समाजानेच दंड थोपटले आहेत. सोलापुरात झालेल्या लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत एकमुखाने तसा ठराव करण्यात आला. लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंनी कोणत्याही प्रकारची आणि कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास समाजाचा विरोध असल्याचं सांगितलं. समाजाचे धर्मगुरू म्हणून आम्ही तुम्हाला स्विकारतो, मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचा फायदा …

डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीला लिंगायत समाजाचाच विरोध

सोलापूर : लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याविरोधात आता लिंगायत समाजानेच दंड थोपटले आहेत. सोलापुरात झालेल्या लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत एकमुखाने तसा ठराव करण्यात आला. लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंनी कोणत्याही प्रकारची आणि कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास समाजाचा विरोध असल्याचं सांगितलं. समाजाचे धर्मगुरू म्हणून आम्ही तुम्हाला स्विकारतो, मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचा फायदा होण्यासाठी समाजाचा वापर करण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका सोलापुरात झालेल्या लिंगायत धर्म मंथन परिषदेत घेण्यात आली.

स्वतंत्र लिंगायत धर्माला आपण विरोध करता, मात्र त्याच समाजाच्या नावावर राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळवता, या भूमिकेलाही यावेळी लिंगायत समाज बांधवांकडून विरोध दर्शवण्यात आला. यावेळी राज्यभरातून या परिषदेला अभ्यासक आणि लिंगायत समाजातील व्यक्तींनी हजेरी लावली होती.

2014 साली देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नवख्या असलेल्या शरद बनसोडे यांनी मोदी लाटेत पराभव केला होता. मात्र, सोलापूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार शरद बनसोडे यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने पक्षातीलच मंडळी बनसोडेवर नाराज आहेत.

सोलापूर लोकसभा आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजपच्या मंडळींचे प्रयत्न सुरु आहेत. मतदार संघातील लिंगायत आणि भक्त मंडळी असणाऱ्या डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर, स्वतः महस्वामी हे सुद्धा मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेते मंडळींच्या संपर्कात आहेत. मात्र, असं असताना लिंगायत समाजातील लोकांचा विरोध उमेदवारीच्या आधीच सुरु झाल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *