AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३१ डिसेंबर रोजी पहाटे पाचपर्यंत खुशाल घ्या दारु पण…पोलिसांनी सांगितले सर्व नियोजन

31 December: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीचे नियोजन माध्यमांना सांगितले. ते म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे शहरात २३ ठिकाणी 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'विरोधात मोहीम राबवण्यात येणार आहे.

३१ डिसेंबर रोजी पहाटे पाचपर्यंत खुशाल घ्या दारु पण...पोलिसांनी सांगितले सर्व नियोजन
31 December
| Updated on: Dec 30, 2024 | 3:25 PM
Share

नववर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणाईसाठी पोलिसांनी चांगली बातमी दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यात पहाटे पाचपर्यंत दारुची दुकाने उघडी ठेवता येणार आहे. परंतु दारु पिऊन सर्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर गोंधळ कोणालाही करता येणार नाही. त्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे. तसेच ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात मोहीम राबवणार आहे. त्यामुळे दारु पिवून गाडी चालवणाऱ्यांची खैर असणार नाही. त्यांचे नववर्ष कारागृहात जाणार आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीचे नियोजन माध्यमांना सांगितले. ते म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे शहरात २३ ठिकाणी ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात मोहीम राबवण्यात येणार आहे. पुण्यात पहाटे ५ पर्यंत दारू दुकानांना परवानगी दिली आहे. परंतु ड्रग्स आणि अल्पवयीन लोकांना दारू न देण्याचे आदेश दिले आहे. या सगळ्या नियमांचे पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार आहे.

असा असणार बंदोबस्त

३१ डिसेंबर रोजी ३००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच ७०० वाहतूक पोलीस तैनात असतील. सीसीटीव्ही कॅमेराचा लाइव्ह मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होते. त्याठिकाणी नजर ठेवण्यात येणार आहे. ४० ठिकाणी अधिकृत पार्ट्या आणि कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोरेगाव भीमा नियोजन सांगितले. पाच हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. एक हजार होमगार्ड आणि आठ कंपनी काम करणार आहे. ७५० पोलीस अधिकारी तैनात असणार आहे. ४५ ठिकाणी पार्किंग सेंटर आहेत. त्यात ३० हजार कार आणि ३० हजार दुचाकी पार्किंग करता येणार आहे. ६५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ३०० सीसीटीव्ही, १० ड्रोन, ५० पोलीस टॉवर, चोरी घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात केले आहे. या ठिकाणी ३१ डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर केला आहे.

व्हीआयपी नेते येणार

मागील वर्षी सात ते आठ लाख लोक आले होते. आता गर्दी वाढेल असे नियोजन करण्यात आले आहे. दहा लाख लोक येतील, अशी अपेक्षा आहे. व्हीआयपी काही नेते येणार आहे. सोशल मीडिया वापरावर निर्बंध असणार आहे. आक्षेपार्ह आढल्यास कारवाई करण्यात येईल.

नगर रस्ता वाहतुकीत बदल कोणते?

  • नगर रस्त्यावरील वाहतूक बदल करण्यात आले आहे. एक जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हा बदल लागू राहणार आहे.
  • पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याला लागावे
  • सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे.
  • मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जावे.
  • मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे अहिल्यानगरकडे जावे.
  • कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव, चौफुलामार्गे शिरूरकडे जावे.
  • इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुयायींच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
  • विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.