LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

नुकसान भरपाईसाठी तातडीने 10 हजार कोटींची तरतदू केली जाणार आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याकडून मदत केली जाईल. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. तसेच लवकरच पंचनामे केले जातील. शेतकऱ्यांनी मोबाईलमधून जरी फोटो काढला तरी तो पंचनामा म्हणून गृहीत धरु, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

02/11/2019,2:08PM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना राहुरी तालुक्यात घडली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तसेच ट्र्रक्टरचे हफ्ते न भरल्यामुळे ट्रॅक्टरचा लिलाव झाल. त्यामुळे हताश झालेल्या या 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले. भारत गधडे असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

02/11/2019,12:31PM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

इचलकरंजीत गॅस स्फोट, एक महिला गंभीर जखमी

इचलकरंजी येथे गॅस स्फोट झाला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी आहे. जुना चंदूर रोडवरील लक्ष्मी व्यंकटेश नगरमध्ये ही घटना घडली. अरुणा माळी असं जखमी महिलेचे नाव आहे.

02/11/2019,12:07PM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

कोकणात भाजप आणि शिवसेनेचे पाहणी दौरे

क्यार वादळानंतर कोकणात भाजप आणि शिवसेनेचे पाहणी दौरे सुरु झाले आहेत. सिंधुदुर्गात भाजप नेते आशिष शेलार यांचा पाहणी दौरा, तर उद्या शिवसेनेचे युवासेना प्रमुख यांचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पाहणी दौरा असणार आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

02/11/2019,12:04PM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत : संजय राऊत

02/11/2019,9:50AM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

जळगावात मुसळधार पाऊस, पिकांचे नुकसान

जळगावात मुसळधार पाऊस पडत आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव परिसरात जोरदार पाऊस आहे. गेल्या 16 तासापासून हा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतीपिकांची मोठी हानी, फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत.

02/11/2019,9:13AM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

चाळीसगावात गिरणा नदीला महापूर येण्याची शक्यता

चाळीसगाव येथे गिरणा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धरणातून 52 हजार 500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गिरणा काठावरील गावं पाण्याखाली जाण्याची भीती आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

02/11/2019,9:11AM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

नागपूरमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

नागपूर येथे सावनेर रस्त्यावरील बोरुजवाडा येथे गराची भितं कोसळून दोन जणांचा मृ्त्यू झाला. ही घटना आज सकाळी 5 वाजता घडली. मृतांमध्ये एक परुण आणि मुलाचा समावेश आहे, तर महिला जखमी आहे.

02/11/2019,9:08AM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 4 नोव्हेंबरला दिल्लीला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करणार असल्याच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याची माहिती.

02/11/2019,8:59AM
, LIVE : नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका

बुलडाण्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनची सर्व पिकं पाहून गेली आहेत. पैनगंगासह लहान नद्यांनाही पूर आलाय, तर काही गावांचा अद्यापही संपर्क तुटला आहे.

02/11/2019,8:56AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *