LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

प्रदीप शर्मा यांचे राजकीय पुनर्वसन करा : सामाजिक संघटना

माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना राज्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली. पंचशिल सेवा संघाचे अध्यक्ष नविन लादे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन पत्र देऊन मागणी केली.

26/10/2019,3:33PM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

तलावात बुडून बहिण-भावाचा मृत्यू

वर्धा येथे तलावात बुडून बहिण-भावाचा मृत्यू झाला. ही घटना सेवाग्राम इथल्या मत्स्यपालन येथे घडली. नेहमीप्रमाणे बकऱ्या चराईसाठी घेऊन जात होते त्यावेळी ही घटना घडली. दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. अविनाश गोडांगे (13 आणि अनुष्का गोडांगे (12) असं मृत झालेल्यांची नावं आहेत.

26/10/2019,3:30PM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

चाळीसगाव येथील हॉस्पिटलमध्ये महिलेचा विनयभंग

चाळीसगाव येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टरनेच 23 वर्षीय महिला रुग्णावर विनयभंग केला. एम.बी. परदेशी असं या डॉक्टराचे नाव आहे.

26/10/2019,12:31PM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

जळगावमधील कंपनीत भीषण आग, लाखो रुपयांचा गुटखा साठा सापडला

जळगाव येथील आशीर्वाद पॉलिथिन अँड प्लॅस्टिक या कंपनीला भीषण आग लागली. विशेष म्हणजे या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुटख्याचा लाखो रुपयांचा साठा सापडला आहे.

26/10/2019,12:22PM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

बार्शीच्या अपक्ष आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूरमधील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा भाजपला पाठिंबा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला त्यांनी पांठिबा दिलाय. महायुतीमध्ये बार्शीची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती.

26/10/2019,12:20PM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्याची हत्या

नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्याची हत्या झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी दुकानात घुसून हत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर दुकानातील लाखो रुपयांचे दागिने लुटले. सराफा व्यापाऱ्यांनी बंद पाळत पोलिसांचा निषेध केला.

26/10/2019,12:14PM
, LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

इगतपुरीजवळ पुष्पक एक्सप्रेसचा डबा घसरला

नाशिक येथे इगतपुरीजवळ पुष्पक एक्सप्रेसचा डबा रुळावरुन घसरला. नाशिक-मुंबई दरम्यानची वाहतूक काही वेळापासून खोळंबली, रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल, ऐन सणासुदीला प्रवाशांचे हाल

26/10/2019,12:11PM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *